Bigg Boss Marathi 3: कौतुक करावं तितंक कमी, दादूसने जिंकली घरातल्या स्पर्धकांची मनं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 15:23 IST2021-11-03T15:23:18+5:302021-11-03T15:23:49+5:30
बिग बॉस मराठीच्या घरातील लाडका सदस्य म्हणजे संतोष चौधरी (दादूस). प्रत्येक सदस्याच्या ते तितकेच जवळचे आहेत.

Bigg Boss Marathi 3: कौतुक करावं तितंक कमी, दादूसने जिंकली घरातल्या स्पर्धकांची मनं
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल सदस्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. बिग बॉस यांनी सदस्यांवर सोपवलेल्या “डब्बा गुल” या साप्ताहिक कार्यामुळे सदस्यांमध्ये बरेच वादविवाद, ओढाताण झाली. या कार्याच्या संचालिका मीनल आणि मीरामध्ये देखील बरेच वाद झाले. आज सदस्यांमधील हे भांडण आणि धक्काबुक्की वेगळ्याच टोकाला जाणार आहे. कार्या दरम्यानचे राडे संपायचे नावचं घेत नाहीये असे दिसून येतं आहे. याच टास्कमुळे आज मीनल आणि विशालमध्ये देखील भांडण होणार आहे. एकीकडे घरातले वातावरण हे दोन स्पर्धकांमुळे तणावाचे बनले आहे. तर दुसरीकडे काही स्पर्धक याकडे दुर्लक्ष करत दादूसची वाहवा करताना दिसत आहेत.
बिग बॉस मराठीच्या घरातील लाडका सदस्य म्हणजे संतोष चौधरी (दादूस). प्रत्येक सदस्याच्या ते तितकेच जवळचे आहेत. कालपासून सुरू झालेल्या साप्ताहिक कार्याच्या दरम्यान दादूस ज्याप्रकारे खेळले त्याच कौतुक स्नेहा, जय, उत्कर्ष आणि नीथा आज करताना दिसणार आहेत. जय म्हणाला, मी दुसर्या फेरीला दादूस यांना आणलं.स्नेहा म्हणाली दादूसला तुम्ही मुद्दाम पाठवलना ? जय म्हणाला त्यांनी स्वत:हून सांगितलं, दादूसचं म्हणाले मी जाणार.स्नेहा म्हणाली त्यांना आम्ही धक्का मारू शकतो का ? मी दादूस यांना पकडल पण होत आणि पाडू पण शकले असते पण. मला असं झालं अरे .उत्कर्ष म्हणाला दादूस म्हणाले की मी एकटा जाणार. गया बंदा और निकाल के लाया. सल्युट आहे त्यांना.मानलं पाहिजे या गोष्टीसाठी. जय म्हणाला काय धावत होते दादूस. उत्कर्ष म्हणाला, क्या किया यार आणि बॉक्स फेकला माहिती आहे ना,भन्नाट खेळले जयने आणि सगळ्यांनीच भरभरून कौतुक केले.