Bigg Boss Marathi 3 : शिवलीला पाटील यांनी घेतला मोठा निर्णय, चाहते झाले हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 01:27 PM2021-10-04T13:27:38+5:302021-10-04T13:28:15+5:30
बिग बॉस मराठी ३ मध्ये किर्तनकार शिवलीला पाटील यांनी अचानक आजारपणाचे कारण सांगून एका आठवड्यानंतर बिग बॉसच्या घरातून काढता पाय घेतला होता.
बिग बॉस मराठी ३ मध्ये किर्तनकार शिवलीला पाटील यांनी अचानक आजारपणाचे कारण सांगून एका आठवड्यानंतर बिग बॉसच्या घरातून काढता पाय घेतला होता. पण त्यावेळी त्या बऱ्या होऊन पुन्हा घरात सहभागी होणार असल्याचे म्हटले होते. मात्र नुकताच त्यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे त्यात त्या एका दवाखान्यात दाखल असल्याचे दिसून येते. बिग बॉसच्या घरात त्यांनी त्यावेळी दिलेला मेसेज महेश मांजरेकर यांच्या उपस्थिती दाखवण्यात आला.
किर्तनकार शिवलीला पाटील म्हणाल्या, ''राम कृष्ण हरी, मी सर्वांची लाडकी कीर्तनकार हरिभक्त परायण कुमारी शिवलीला बाळासाहेब पाटील मी बिग बॉस सीझन ३ या मराठी कार्यक्रमात सहभागी झाले होते. माझी तब्येत अचानक खराब झाली होती. त्यानंतर बिग बॉसच्या घरामध्येदेखील ३-४ टेस्ट झाल्या होत्या. टॅबलेट घेतल्या, गोळ्या घेतल्या, औषधे घेतली ट्रीटमेंट देखील घेतली. मात्र त्याचा काहीच फायदा होत नव्हता. आराम करून देखील काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे मी हॉस्पिटलला शिफ्ट झाले. तेव्हापासून आत्तापर्यंत माझी ट्रीटमेंट चालू आहे. अजूनही थकवा आहे. त्यामुळे मी स्वतःहून बिग बॉसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.''
त्या पुढे म्हणाल्या की, ''माझे शरीर मला साथ देत नाही. त्यामुळे मला नाही वाटत की मी आता तिथे सहभाग घेऊ शकेन. त्यामुळे बाहेर येणे हा माझा स्वतःचा निर्णय आहे. मी स्वतःच्या मतावर ठाम आहे. मी स्वतःच्या मर्जीने या शो मधून बाहेर पडत आहे. मला महेश सरांची माफी मागायची आहे मी त्यांना सांगितले होते की मी नक्की सहभागी होईल पण आता ते शक्य वाटत नाही. सर्वानी माझी काळजी घेतली. विशेष म्हणजे विशाल दादा, मीनल सोनाली, सुरेख ताई या सर्वांशी माझे चांगले बॉण्डिंग झाले. मला तुमच्या सोबत राहायची इच्छा होती.''
शिवलीला पाटील यांनी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे चाहते हैराण झाले आहेत.