Bigg Boss Marathi 3, Episodes, 29 Nov: 'ट्रॉफी तर एकच आहे, ती...'; मीरा, जय आणि उत्कर्षमध्ये सुरू आहे गंभीर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 12:12 IST2021-11-29T12:11:28+5:302021-11-29T12:12:55+5:30
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार आहे मीरा, उत्कर्ष आणि जय यांची एका खास विषयावरून चर्चा

Bigg Boss Marathi 3, Episodes, 29 Nov: 'ट्रॉफी तर एकच आहे, ती...'; मीरा, जय आणि उत्कर्षमध्ये सुरू आहे गंभीर चर्चा
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार आहे मीरा, उत्कर्ष आणि जय यांची एका खास विषयावरून चर्चा... जय आणि उत्कर्ष मीराला सल्ला देणार आहेत याचसोबत जय बिग बॉस मराठी या शो विषयी त्याला काय महत्वाचं वाटतं हे उत्कर्ष आणि मीराला सांगताना दिसणार आहे.
उत्कर्ष मीराला सांगताना दिसणार आहे, मीरा तू स्पर्धक म्हणून स्वत:ला किती बाहेर टाकू शकतेस या गोष्टीमधून हे महत्वाचे आहे... ट्रॉफी तर एकच आहे, ती एकालाच मिळणार आहे. जयचे त्यावर म्हणणे आहे, मी मगाशी तेच म्हटलं की, जिंकणे किंवा हरणे या शोला महत्वाचे नसते. या शोसाठी काय महत्वाचे आहे तुम्ही या शोला काय देताय आणि या शोसोबत तुमचे नाव कसे जोडले जाते. आज बिग बॉस मराठी सीझन ३चे जेव्हा नाव घेतले जाते त्यावेळेला कोणत्या स्पर्धकाचे नाव पहिले येते, विजेत्याचे नाव पहिले येत नाही. मला असे वाटते तो जर ऑन झाला ना अजून मजा येते, आपल्याला भिडायला मजा येते ना... नाहीतर विकास येत नाही रे.
टास्क जिंकणे किंवा हरणे महत्वाचे नाही
जय पुढे म्हणाला, विकास काहीच करत नाही. मागच्या आठवड्यात तो नाही आला तर मग कोणीच नाही आले. टास्क जिंकणे किंवा हरणे महत्वाचे नाही ना तुमचे एफर्ट्स...ही चर्चा किती रंगली, हे पाहण्यासाठी आजचा एपिसोड पाहावा लागेल.