Bigg Boss Marathi 3: आजच्या टास्कमध्ये पहायला मिळणार राडे, मीराला सेफ करायचा आहे बॉक्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 20:50 IST2021-11-02T20:49:42+5:302021-11-02T20:50:05+5:30
Bigg Boss Marathi 3:बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज डब्बा गुल हे साप्ताहिक कार्य रंगणार आहे.

Bigg Boss Marathi 3: आजच्या टास्कमध्ये पहायला मिळणार राडे, मीराला सेफ करायचा आहे बॉक्स
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज डब्बा गुल हे साप्ताहिक कार्य रंगणार आहे. या कार्यासाठी दोन्ही टीममधील सदस्य रणनिती आखताना दिसणार आहेत. टास्क सुरू होण्याआधी टीममधील सदस्य विरुध्द टीमला टास्कमध्ये कसे हरवता येईल याची योजना आखणार आहेत. यामध्ये मीरा तिच्या टीममधील सदस्यांसोबत तर दुसरीकडे जय आणि उत्कर्ष त्याच्या टीममधील सदस्यांसोबत चर्चा करत आहेत आणि स्ट्रॅटजी आखताना दिसत आहेत .
डब्बा गुल या टास्क दरम्यान सदस्यांमध्ये बरीच धक्काबुक्की बघायला मिळणार आहे. सदस्य एकमेकांना टोमणे मारताना दिसणार आहेत. आजच्या टास्कमध्ये राडे होताना दिसणार आहेत. मीरा विरुध्द टीमला सांगताना दिसणार आहे, तुम्ही आरडाओरडा नका करू आम्ही पण नाही करणार. तुम्ही जर (बॉक्स) वरती टाकले तर आम्ही पण नाही परवानगी देणार. मीरा हेदेखील बोलताना दिसली चढू वर टाकू दे रिजेक्ट आहेत ते, वरती जे टाकणार ते रिजेक्ट आहे. मीरा नीथाला म्हणाली, मला सेफ करायचा आहे ते सुद्धा.
त्याच्या रक्तातच आहे ते… - दादूस
मीराचे म्हणणे आहे, तिकडे (बॉक्स) आणल्या आणल्या सगळ्यांनी चालू करायचं गाठी मारायला. तर जय सांगत आहे, जेव्हा मी (बॉक्स) आणणार ना तेव्हा ते प्रोटेक्ट करण्यासाठी एक माणूस हवा तर दादूस देखील टीमला मदत करणार आहेत रस्सी बांधायला, गायत्री आहेच. कारण मला असं दिसतं आहे शंभर टक्के विकास येणारच. जरी त्याच्याकडे जास्त असतील ना (बॉक्स) तरी तो येणारच. दादूस म्हणाले त्याच्या रक्तातच आहे ते, काहीना काही करायला तो येतोच. उत्कर्ष म्हणाला शंभर टक्के रिबिन कापायला येतील.