Bigg Boss Marathi 3:  बिग बॉस मराठीच्या घरातून तृप्ती देसाईंची एक्झिट, तर राजकारणात होणार एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 12:00 AM2021-11-08T00:00:55+5:302021-11-08T00:04:58+5:30

लवकरच राजकारणात करणार प्रवेश, तृप्ती देसाई यांची माहिती

Bigg Boss Marathi 3: Trupti Desai's exit from Bigg Boss Marathi's house, will be an entry in politics | Bigg Boss Marathi 3:  बिग बॉस मराठीच्या घरातून तृप्ती देसाईंची एक्झिट, तर राजकारणात होणार एन्ट्री

Bigg Boss Marathi 3:  बिग बॉस मराठीच्या घरातून तृप्ती देसाईंची एक्झिट, तर राजकारणात होणार एन्ट्री

googlenewsNext

बिग बॉस मराठी ३ (Bigg Boss Marathi 3) च्या घरातून तृप्ती देसाई (Trupti Desai) रविवारी बाहेर पडल्या. यावेळी तृप्ती देसाई यांना निरोप देताना बिग बॉसच्या घरातील अन्य सदस्यही भावूक झाल्याचं दिसून आले होते. तसंच निरोपाच्या वेळी तृप्ती देसाईदेखील भावूक झाल्या होत्या. यावेळी त्यांनी सर्वांना चांगले खेळण्याचा सल्ला देत कधीही कॉल करा तुम्हाला नक्कीच मदत करेन, असं आश्वासनही दिलं. तसंच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताना आपण लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना भेटायला गेले कलर्स मराठी परिवरातील सदस्य. जीव माझा गुंतला मालिकेतील अंतरा आणि मल्हार यांनी घरातील सदस्यांसोबत बरीच धम्माल मस्ती केली. मीरा–जय, विशाल–मीरा आणि दादूस–मीनल– नीथा यांनी एकापेक्षा एक जबरदस्त परफॉर्मन्स सादर केले. तर विशाल आणि सौरभ यांनी त्यांच्या काही आठवणी शेअर केल्या. घरातील सदस्यांचे त्यांनी कौतुकदेखील केले. याचसोबत सदस्यांना त्यांच्या घरून आलेले गिफ्ट्स मिळाल्याने दिवाळीचा हा आनंद द्विगुणित झाला. या आठवड्यात नॉमिनेशन मध्ये आलेल्या सदस्यांमपैकी मीनल आणि विशाल सेफ झाले. 

दरम्यान, जय, सोनाली आणि तृप्ती देसाई या तीन जणांमधून आज कोणाला घराबाहेर जावे लागेल याबाबत प्रेक्षकांकडून तर्कवितर्क लढवले जात होते. परंतु जय दुधाणे आणि तृप्ती देसाई हे दोन सदस्य डेंजर झोनमध्ये आले असल्याचं महेश मांजरेकरा यांनी सांगितलं. तृप्ती देसाई यांना या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले.  

Web Title: Bigg Boss Marathi 3: Trupti Desai's exit from Bigg Boss Marathi's house, will be an entry in politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.