Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसचे घर आहे रेस्टॉरंट नाही, स्पर्धकांना पडला विसर, बिग बॉसना दिली ऑर्डर ?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 03:14 PM2021-10-06T15:14:31+5:302021-10-06T15:22:30+5:30
Bigg Boss Marathi 3:च्या घरात जय, स्नेहा, गायत्री, सूरेखाताई, तृप्तीताई, मीरा सगळेच बसून जेवणाचा आनंद घेताना दिसत आहेत.
बिग बॉस आदेश देत आहेत, बिग बॉस सांगू इच्छितात असे आपण ऐकतो. पण जयने जरा काहीतरी वेगळेच केले आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काही गोष्टी सदस्यांना दिल्या जातात आणि काही गोष्टींपासून त्यांना वंचित राहावे लागते. कधी कधी बिग बॉस त्यांना या गोष्टी मिळविण्याची संधी देखील देतात. पण जयने बिग बॉसलाच ऑर्डर दिली आहे. बिग बॉस माझ्यासाठी एक लोणच्याची बाटली पाठवून द्या, जर तुम्ही आमच्यावर प्रेम करता तर”.
तृप्तीताई म्हाणल्या “सारखं आपलं तुम्ही आमच्या प्रेम करत असाल तर हे पाठवून द्या, ते पाठवून द्या. गायत्री म्हणाली, “त्यांच्या ठरलेल्या गोष्टींपैकी ते पाठवतील ते प्रेम असेल तर बाकी काही नवीन पाठवणार नाहीत. जय, स्नेहा, गायत्री, सूरेखाताई, तृप्तीताई, मीरा सगळेच बसून जेवणाचा आनंद घेताना दिसत आहेत.
कोणाला चाईनीज खायचं आहे तर कोणाला लोणचं तर कोणाला वेज ट्रिपल शेजवान फ्राइड राइस खायचा आहे तर कोणाला चिकन तर कोणाला मंचुरियन तर कोणाला पनीर चिली. यांच्या डिमांडकडे बघून असं वाटत आहे सदस्य विसरले आहेत ते बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रेस्टोरंट मध्ये नाही. पुढे जयचं म्हणणं होतं अजून जास्त प्रेम करत असाल तर लस्सी पाठवा. एक नाही संपत तर दुसरी डिमांड तयार होती. असो ! इच्छा व्यक्त करूनच त्यांना जरा बरं वाटलं असावं असं म्हणायला हरकत नाही.
काही दिवसातच घरातील काही सदस्य एका गृपमध्ये तर काही सदस्य दुसर्या गृपमध्ये दिसून आले. काही सदस्य नक्की कुठल्या गृपमध्ये हे काही कळत नव्हतं. पण जसजसे दिवस पुढे जात आहेत आता ते स्पष्ट होते आहे. काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एक टास्क रंगला. त्यासाठी बिग बॉस यांनी दोन गृप घोषित केले. आणि त्याच टास्क संदर्भात आज विकास आपलं मत स्पष्टपणे मांडताना दिसणार आहे. आज घरामध्ये काय काय होणार ? कोणतं नवं आव्हान बिग बॉस सदस्यांसमोर उभ रहाणार ? पाहणे नक्कीच रंजक असणार आहे.