Bigg Boss Marathi 3 Update: अचानक ट्रेंड व्हायला लागला विकास पाटील,जाणून घ्या कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 10:40 AM2021-11-27T10:40:09+5:302021-11-27T10:40:45+5:30
Bigg Boss Marathiदोघांमधला वाद इतका वाढत गेला दोघेही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत होते. दोघेही त्यांचे भांडण थांबवायचे नाव घेत नव्हते.
बिग बॉस मराठी सिझन ३ सुरु झाल्यापासून प्रचंड चर्चा आहे. घरातले स्पर्धकही रसिकांचे फुल ऑन मनोरंजन करत आहेत. या शोमुळे अनेक स्पर्धकांना एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे स्पर्धकही चाहत्यांचे आवडीचे बनले आहेत. त्यांच्याविषयी जाणून घेण्यात चाहत्यांनाही प्रचंड उत्सुकता असते. सोशल मीडियावर स्पर्धक वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतात. आता आणखी एका स्पर्धकाची जोरदार चर्चा होत आहे. सोशल मीडियावर विकास पाटील अचानक ट्रेंड होत आहे. विकास पाटीलचे ट्रेंड होण्याचे कारणही तसेच खास आहे.
नुकताच घरामध्ये कॅप्टन्सी टास्क पार पडला. टास्कदरम्यान अनेक स्पर्धकांमध्ये वाद होत असतात. असेच काहीसे या टास्कदरम्यानही घडले. नॉमिनेशन टास्क जिंकून जय आणि मीरा हे दोघे स्पर्धक कॅप्टन्सी उमेदवारी साठी पात्र ठरले होते.अशातच घरातील इतर सदस्यांना या दोघांना कॅप्टन्सी मिळवून देण्यासाठी टास्क खेळायचा होता. यासाठी २ ग्रुप्सही करण्यात आले होते.
जयच्या टीममध्ये विशाल आणि मीनल होते. तर मीराच्या टीममध्ये विकास आणि उत्कर्ष होते. तर बाकी सदस्य या टास्कसाठी चिअरअप करत होते. दरम्यान टास्क जिंकण्यासाठी विकास आणि विशालने कोणतीही कसर सोडली नाही. यावेळी विशालने विकासला टॅकल करत, खाली जमिनीवर पाडलं होतं. तर विकास त्याच्याकडून सुटका करण्यासाठी धडपड करत होता. मात्र विशाल यात वरचढ ठरला. पण त्याने विकासला अजिबात निसटू दिलं नाही. इतकंच नव्हते तर विकासला पाणी प्यायचंय असेही सांगितले पण विशालने त्याला सोडलं नाही. त्याला टॅकल करूनच पाणी प्यायला दिलं.
दोघांमधला वाद इतका वाढत गेला दोघेही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत होते. दोघेही त्यांचे भांडण थांबवायचे नाव घेत नव्हते.टास्कदरम्यान विकासची खेळी पाहून रसिकही त्याची बाजु घेत त्याला पाठींबा देत आहेत.सोशल मीडियावर सध्या त्याचीच चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.