Bigg Boss Marathi 3, Episodes, 12 Oct: 'आदिश कॉमेडी आहे'; नव्या स्पर्धकाची एण्ट्री होताच उत्कर्षचं गॉसिपिंग सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 12:51 PM2021-10-12T12:51:48+5:302021-10-12T12:52:50+5:30
Bigg boss marathi 3: काल जय आणि आदेशमध्ये मोठं भांडण झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळेच आदिशविषयी घरातील काही सदस्यांची मतं चांगली नसल्याचं दिसून येत आहे.
'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या (Bigg Boss Marathi 3) पर्वातील नॉमिनेशन प्रक्रिया अलिकडेच पार पडली आहे.यात अक्षय वाघमारे (akshay waghmare) याला घरातून काढता पाय घ्यावा लागला. मात्र, अक्षय घरातून बाहेर पडल्यानंतर लगेचच आदिश वैद्य (adish vaidya) या स्पर्धकाची वाईल्ड कार्ड एण्ट्री झाली आहे. विशेष म्हणजे आदिशने घरात प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच त्याची चर्चा होऊ लागली आहे. बिग बॉसच्या आदेशानुसार, आदिशने तीन स्पर्धकांची पहारेकरी म्हणून नियुक्त केल्यामुळे अनेक जण त्याच्यावर नाराज आहेत. इतकंच नाही तर, आता आदिश म्हणजे फक्त कॉमेडी अशी कमेंट उत्कर्षने केली आहे.
आदिश घरामध्ये जाताच त्याला एक नवा टास्क देण्यात आला आणि त्याने तो पूर्णपणे निभावला देखील. पॉवरकार्ड स्वीकारले आणि त्याची किंमत घरातील तीन सदस्यांना आता मोजावी लागत आहे. दादुस, मीनल आणि जय हे बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घराचे पहारेकरी असणार आहेत. काल जय आणि आदेशमध्ये मोठं भांडण झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळेच आदिशविषयी घरातील काही सदस्यांची मतं चांगली नसल्याचं दिसून येत आहे. यामध्येच आज जय, स्नेहा, गायत्री आणि उत्कर्ष यांच्यामध्ये त्याच्याविषयी चर्चा होणार आहे.
Bigg Boss: अश्लीलतेचा कळस! किसिंग सीनपासून चादर शेअर करेपर्यंत स्पर्धकांनी पार केल्या मर्यादा
"एक खरं सांगू का गायत्री मला तुझा अॅटीट्युड आवडतो", जयचं हे वाक्य ऐकल्यानंतर "माझ्या मित्राला कोणी काही बोललं तर मी नक्कीच तोंडावर सगळं बोलणार", असं गायत्रीने उत्तर दिलं. जय-गायत्रीच्या चर्चेमध्येच उत्कर्षने उडी घेतली. "तो कॉमेडी आहे. त्याचा हा सगळा दिखावा आहे. इथे सगळ्यांना वाटतं आहे दोन दिन की चांदी है !", असं उत्कर्ष म्हणाला.
दरम्यान, ''तो सव्वाशेर असल्यासारखा चालतो, खरंच तो कॉमेडी आहे'', असं जयने उत्कर्षला उत्तर दिलं. त्यावर गायत्रीने लगेच आदिशच्या चालण्याची नक्कल करुन दाखवली. त्यामुळे आजच्या भागात काय होणार? आदिशचं पुन्हा घरातील सदस्यांसोबत वाद होणार का? हे पाहणं औत्सुक्याचं आहे.