जयनंतर उत्कर्षला मिळाली मोठी ऑफर; लवकरच झळकणार 'या' शोमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 10:19 AM2022-01-05T10:19:25+5:302022-01-05T10:20:06+5:30

Utkarsh shinde: सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये उत्कर्ष शिंदे लवकरच एका नव्या कार्यक्रमात झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

bigg boss marathi 3 utkarsh shinde new role in upcoming tv show | जयनंतर उत्कर्षला मिळाली मोठी ऑफर; लवकरच झळकणार 'या' शोमध्ये

जयनंतर उत्कर्षला मिळाली मोठी ऑफर; लवकरच झळकणार 'या' शोमध्ये

googlenewsNext

छोट्या पडद्यावर तुफान गाजलेला शो 'बिग बॉस मराठी' (bigg boss marathi) या कार्यक्रमाचं तिसरं पर्व अलिकडेच संपलं. परंतु, अजूनही या पर्वाची आणि त्यातील कलाकारांची सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे. यंदाचं पर्व विविध कारणांसाठी चर्चेत राहिलं. पण, त्यात खासकरुन स्पर्धकांची टास्क खेळण्याची पद्धत विशेष गाजली. या शोमुळे विशाल निकम (vishal nikam), जय दुधाणे (jay dudhane), उत्कर्ष शिंदे (utkarsh shinde), विकास पाटील (vikas patil) आणि मीनल शाह (meenal shah) या टॉप ५ स्पर्धकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. इतकंच नाही तर या शोमुळे जय दुधाणेचं नशीब चांगलंच चमकलं. प्रसिद्धीसोबतच त्याला दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या चित्रपटात काम करण्याचीही संधी मिळाली. परंतु, आता त्याच्यानंतर त्याचा या घरातील बेस्टफ्रेंड उत्कर्ष शिंदे याच्याही पदरात एक नवा कोरा शो पडल्याचं सांगण्यात येत आहे. 

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये उत्कर्ष शिंदे लवकरच एका नव्या कार्यक्रमात झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरात आपल्या कवितांनी घरातल्यांसह प्रेक्षकांची मनं जिंकणारा उत्कर्ष या नव्या कार्यक्रमात सूत्रसंचालकाची भूमिका बजावणार आहे. 

दरम्यान, बिग बॉसच्या घरात शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करुन खेळणारा स्पर्धक म्हणून उत्कर्षने त्याची ओळख निर्माण केली होती. विशेष म्हणजे घरातील प्रत्येक स्पर्धकासोबत मैत्रीचं नातं उत्कर्षने शेवटपर्यंत जपलं होतं. उत्कर्ष एक डॉक्टर असण्यासोबतच उत्तम गायकदेखील आहे. आणि, आता लवकरच तो सूत्रसंचालकाच्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. कलर्स मराठीवर हा शो सुरु होणार असून यात उत्कर्ष दिसून येणार आहे.
 

Web Title: bigg boss marathi 3 utkarsh shinde new role in upcoming tv show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.