Bigg boss marathi: 'त्यांचं व्यक्तिमत्त्व काय?' थेट Bigg boss वर केली उत्कर्षने कविता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 06:39 PM2021-12-13T18:39:22+5:302021-12-13T18:49:01+5:30

Bigg boss marathi: उत्कर्षने थेट बिग बॉसवरच कविता केली आहे. या कवितेतून सामान्यांना पडलेले प्रश्नही तो त्यातून मांडतांना दिसत आहे.

 bigg boss marathi 3 utkarsh shinde poem made bigg boss day | Bigg boss marathi: 'त्यांचं व्यक्तिमत्त्व काय?' थेट Bigg boss वर केली उत्कर्षने कविता

Bigg boss marathi: 'त्यांचं व्यक्तिमत्त्व काय?' थेट Bigg boss वर केली उत्कर्षने कविता

googlenewsNext


बिग बॉस मराठीच्या (bigg boss marathi) घरामध्ये आज सगळे स्पर्धक कवी होणार असल्याचं दिसून येत आहे. तृप्ती देसाईंनी ( trupti desai) कविता सादर केल्यानंतर उत्कर्षही (utkarsh shinde) कविता करणार आहे. विशेष म्हणजे त्याने थेट बिग बॉसवरच कविता केली आहे. या कवितेतून सामान्यांना पडलेले प्रश्नही तो त्यातून मांडतांना दिसत आहे.

आजवर बिग बॉस कसे दिसतात, ते कोण आहेत याचा थांगपत्ता अजूनही कोणाला लागलेला नाही. आतापर्यंत सगळ्यांनीच फक्त त्यांचा आवाज ऐकला आहे. त्यामुळे या बिग बॉसविषयी उत्कर्षने त्याचं मत मांडलं आहे. सोबतच बिग बॉसचा आवाज ऐकल्यावर स्पर्धकांची काय अवस्था होते हेही त्याने सांगितलं.' ज्याचा आवाज ऐकल्यावर रडायला येतं. कारण आपल्याला त्यांची identity माहितीच नाहीये, व्यक्तिमत्व कोण ? कसं काय ? कोण आहे ती व्यक्ती ? पण ज्याप्रकारे ते आपल्याला नरेट करतात, गोष्टी आपल्याला सांगतात...,  असं म्हणत उत्कर्ष ही कविता जयला ऐकवणार आहे.

 "ह्या मंचाचा देव, पुण्याईची ठेव, लाखात एकमेव..बिग बॉस आमच्यासाठी तुम्ही. आईची माया, बापाची छाया जसा सोबत नेहमी विठुराया.. तसे आमच्यासाठी तुम्ही. प्रेमाचे शिंपण, मायेचे कुंपण घराला घरपण.. बिग बॉस आमच्यासाठी तुम्ही. आनंदाची लाट आदर्शाची वाट उत्कर्षाची पहाट.. बिग बॉस आमच्यासाठी तुम्ही, अशी कविता उत्कर्ष बिग बॉसवर करतो.

दरम्यान,  उत्कर्षने या कवितेतून ज्या बिग बॉसला कधीच पाहिलं नाही तो आमच्यासाठी नेमका कसा आहे हे सांगितलं आहे. 
 

Web Title:  bigg boss marathi 3 utkarsh shinde poem made bigg boss day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.