2nd Runner up ठरलेल्या विकास पाटीलने एका दिवसात घेतला bigg boss मध्ये जाण्याचा निर्णय; जाणून घ्या त्याचा रंजक प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 07:45 PM2021-12-27T19:45:00+5:302021-12-27T19:45:00+5:30
Vikas Patil: 'बिग बॉस मराठी ३ 'मध्ये सहभागी होण्यापूर्वी विकास छोट्या पडद्यावरील 'बायको अशी हव्वी' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत होता. मात्र, ही मालिका बंद झाल्यानंतर अवघ्या एक दिवसाचा गॅप घेऊन तो थेट बिग बॉसच्या घरात दाखल झाला.
छोट्या पडद्यावर तुफान गाजलेलं 'बिग बॉस मराठी'चं (bigg boss marathi) तिसरं पर्व नुकतंच संपलं आहे. रविवारी ( २६ डिसेंबर) या तिसऱ्या पर्वाचा ग्रँड फिनाले ठरला. यंदाच्या पर्वात अभिनेता विशाल निकम हा विजेता ठरला आहे. तर, जय दुधाणे हा उपविजेता ठरला आहे. त्यामुळे या सोशल मीडियावर या दोघांची चर्चा आहे. परंतु, या दोघांसोबतच आणखी एका बिग बॉस स्पर्धकाची चर्चा रंगतांना दिसत आहे. हा स्पर्धक म्हणजे बिग बॉस मराठी ३ चा 2nd Runner up ठरलेला विकास पाटील. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये विकासने बिग बॉसच्या घरात त्याची एन्टी कशी झाली हे सांगितलं आहे.
'बिग बॉस मराठी ३ 'मध्ये सहभागी होण्यापूर्वी विकास छोट्या पडद्यावरील 'बायको अशी हव्वी' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत होता. मात्र, ही मालिका बंद झाल्यानंतर अवघ्या एक दिवसाचा गॅप घेऊन तो थेट बिग बॉसच्या घरात दाखल झाला. याविषयी सांगतांना केवळ १ दिवसच मला विचार करायला वेळ मिळाला. पण, त्या १ दिवसामुळेच आज मला इतक्या लोकांचं प्रेम मिळालं असं तो म्हणाला.
"कलर्स मराठीवर आमची बायको अशी हव्वी ही मालिका सुरु होती. पण, ती लवकरच संपणार हे आम्हाला समजलं होतं. साधारणपणे १५ दिवसांपूर्वीच मालिका संपणार असं आम्हाला कळलं होतं. मात्र, त्याच्यानंतर मी बिग बॉसमध्ये जाणार आहे वैगरे असं काहीच डोक्यात नव्हतं. ज्यावेळी चॅनेलला ही गोष्ट समजली त्यावेळी त्यांनी मला अप्रोच केलं. आणि, क्वारंटाइन होण्याच्या दोन दिवस आधी त्यांनी मला फोन केला. यातही आम्ही खूप शॉर्ट नोटिसवर तुला विचारतोय. तर, तू तयार आहेस का?", असा प्रश्न मला विचारला.
पुढे तो म्हणतो, "खरं तर विचार करायला खूप कमी वेळ होता. कारण, एका दिवसात निर्णय द्यायचा होता. यातही मला स्वत:ला तयार करणं आणि कुटुंबियांचं मत विचारात घेणं गरजेचं होतं. माझी बायको बिग बॉस पाहायची त्यामुळे मीदेखील काही सीजन पाहिले होते. त्यानुसार, माझी मी स्टॅटजी आखली होती. सगळ्यात आधी घरात कसं वातावरण आहे ते पाहुयात आणि, मी जसा आहे तसंच प्रेक्षकांसमोर येऊयात हे ठरवलं होतं."
दरम्यान, "मी टॉप ५ फायनलिस्टमध्ये येईन असं वाटलंही नव्हतं. पण, माझ्यातले प्लस पॉइंट्स किंवा माझे स्ट्राँग पॉइंट्स आहेत त्याच्या जोराववर मी इतरांना भारी पडू हा कॉन्फिडन्स होता", असंही विकासने यावेळी सांगितलं. विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरात शांत, संयमाने वावरणारा विकास पाटील 'बिग बॉस मराठी ३'चा 2nd Runner up ठरला असून सध्या तो सोशल मीडियावर चर्चेत येत आहे.