Bigg Boss Marathi 3, Episodes, 12 Dec: 'विशाल सगळं कॅमेरासाठीच करतो'; मीनलची ती चुगली पोहचणार विशालपर्यंत, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 18:33 IST2021-12-12T18:32:08+5:302021-12-12T18:33:27+5:30
Bigg Boss Marathi 3: या घरात शेवटचे ८ स्पर्धक राहिले असून घरात सदस्यांमध्ये असलेले मतभेद किंवा मनभेद अजूनही दूर न झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Bigg Boss Marathi 3, Episodes, 12 Dec: 'विशाल सगळं कॅमेरासाठीच करतो'; मीनलची ती चुगली पोहचणार विशालपर्यंत, पण...
छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस मराठी'चं (Bigg Boss Marathi 3) तिसरं पर्व हळूहळू ग्रँड फिनालेकडे वाटचाल करु लागलं आहे. अलिकडेच या घरात यंदाच्या पर्वातील शेवटचं कॅप्टन्सी कार्य पार पडलं. या कार्यात मीनल शहा (meenal shah) घराची नवीन कॅप्टन झाली. या घरात शेवटचे ८ स्पर्धक राहिले असून प्रत्येकालाच बिग बॉसची ट्रॅाफी जिंकायची आहे. विशेष म्हणजे गेल्या ८१ दिवसांपासून एकत्र राहणाऱ्या या घरात सदस्यांमध्ये असलेले मतभेद किंवा मनभेद अजूनही दूर न झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्येच आता मीनल आणि विशालमध्ये (vishal nikam) नवीन वाद निर्माण होणार आहे.
कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधव (siddharth jadhav) आजच्या बिग बॉसच्या चावडीवर येणार आहे. विशेष म्हणजे सिद्धार्थसमोरच विशाल, मीनलला खडे बोल सुनावणार आहे. विशालचा एक चाहता त्याला मीनलची चुगली सांगणार आहे. त्यानुसार, 'विशाल फक्त कॅमेरासाठीच सगळं करतो', असं मीनलने म्हटल्याचं त्याला समजणार आहे.
"मीनल सोनालीला म्हणत होती की, विशाल कोणत्याही गोष्टीवर रिअॅक्शन देतो आणि ते एक्स्ट्रीम असतं. आणि, ते कुठे तरी कॅमेरासाठीच असतं असं वाटत", असं मीनलने सोनालीला सांगितल्याचं विशालला समजतं. त्यावर विशाल त्याची प्रतिक्रिया देतो.
दरम्यान, मी जे बोलतो ते मनातून येतं आणि तेच माझ्या ओठांवर असतं. मी कधीच कोणती गोष्ट कॅमेरासाठी केली नाही. आणि, हे घरातले लोकही सांगितली. उलट तूच कॅमेरासाठी करते कारण, तू हा शो पाहून आलीये आणि यापूर्वीही असे रिअॅलिटी शो केले आहेत. पण, मी कधीच कोणती गोष्ट कॅमेरासाठी केली नाही आणि करणारही नाही, असं विशाल तिला सांगतो. आता विशालच्या या वक्तव्यावर मीनलची नेमकी काय प्रतिक्रिया किंवा उत्तर असेल हे आजच्या बिग बॉसच्या चावडीवरच प्रेक्षकांना कळणार आहे.