Bigg Boss Marathi 3 : विशालने केला विकासचा विश्वासघात ?, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 17:52 IST2021-11-30T17:51:38+5:302021-11-30T17:52:13+5:30
Bigg Boss Marathi 3: विकासला असं वाटतंय की विशालने त्याचा विश्वासघात केला आणि हीच गोष्ट तो सोनालीसमोर बोलून दाखवणार आहे.

Bigg Boss Marathi 3 : विशालने केला विकासचा विश्वासघात ?, जाणून घ्या याबद्दल
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नुकतेच नॉक आउट हे नॉमिनेशन कार्य पार पडले. ज्यामध्ये सोनाली, विकास, गायत्री, मीनल घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले. आज बघूया काय होते. पण, यामुळे विकासला असं वाटतं आहे विशालने त्याचा विश्वासघात केला आणि हीच गोष्ट तो सोनालीसमोर बोलून दाखवणार आहे.
विकास सोनालीला म्हणाला, विशाल निकमने परत एकदा स्वत:ला सुरक्षित करून घेतले. म्हणून मी जयला म्हणालो आधी त्याला नॉमिनेट कर मग मला कर. त्याला पण कळू दे विश्वासघात काय असतो. सोनालीचे म्हणणे आहे, हे जरी कटू सत्य असले तरीदेखील त्यांच्यासाठी तुझ्यापेक्षा तोच उजवा आहे. विकासचे म्हणणे आहे, मला माहिती आहे आम्ही येणार पण आधी तो आला पाहिजे. पुढे काय घडले, हे जाणून घेण्यासाठी आजचा एपिसोड पाहावा लागेल.
बिग बॉस देणार एक टास्क
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सदस्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्य भेटायला येणार आहेत. जवळपास ६५ दिवसाहून अधिक कालावधीनंतर आपल्या परिवारातील सदस्यांना स्पर्धक भेटणार आहेत. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून आपण पाहिले की विकासला भेटण्यासाठी त्याची बायको घरामध्ये आली तर जयला त्याच्या आई वडिलांनी भेट दिली. पण या भेटीसाठी देखील सदस्यांना बिग बॉस एक टास्क देणार आहे असे दिसते आहे. ज्यामध्ये सदस्यांना किती वेळ द्यावा याचा निर्णय घरातील सदस्य ठरवणार आहेत. जास्तीत जास्त वेळ आपल्याला का देण्यात यावा याचे कारण घरातील इतर सदस्यांना सांगायचे आहे. आणि याचवरून मीरा विकासला मनवण्याचा प्रयत्न करते आहे.