Bigg Boss Marathi 3: असं काय घडलं की नीथा शेट्टी म्हणतेय- 'आयुष्यात स्नेहा वाघला कधीच भेटायचं नाहीये'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 07:00 AM2021-11-18T07:00:00+5:302021-11-18T07:00:00+5:30

Bigg Boss Marathi 3: मला स्नेहा वाघ हिला आयुष्यात पुन्हा कधीही भेटायला आवडणार नाही, असे नीथा शेट्टी-साळवी हिने म्हटले आहे.

Bigg Boss Marathi 3: What Happens When Neetha Shetty Says- 'Never Want To Meet Sneha Waghla In Life' | Bigg Boss Marathi 3: असं काय घडलं की नीथा शेट्टी म्हणतेय- 'आयुष्यात स्नेहा वाघला कधीच भेटायचं नाहीये'

Bigg Boss Marathi 3: असं काय घडलं की नीथा शेट्टी म्हणतेय- 'आयुष्यात स्नेहा वाघला कधीच भेटायचं नाहीये'

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनमध्ये अभिनेत्री नीथा शेट्टी-साळवी हिची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली होती. पण दोन आठवड्यातच तिला घराबाहेर पडावे लागले. याबद्दल अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केली. त्यामुळे अनेकांनी शोवर देखील टीका केलेली आहे. एका मुलाखतीत नीथाने बिग बॉसच्या घरातील अनुभवाबद्दल सांगितले. यावेळी तिने घरातील सदस्यांबद्दल देखील सांगितले. 

बिग बॉसच्या घरामध्ये खेळायला मिळणे ही लाइफ टाइम अचिव्हमेंट असल्याचे तिने सांगितले आहे. ती म्हणाली की, माझे सगळे बालपण विक्रोळीत गेले. त्यामुळे विक्रोळी आणि मराठी लोकांविषयी मला खूप आदर आहे. माझा नवरा देखील मराठी आहे.

घरामध्ये विशाल हा माझा अतिशय चांगला मित्र होता

बिग बॉस मराठी ३च्या घरामध्ये विशाल हा माझा अतिशय चांगला मित्र होता.  विशाल, विकास, सोनाली यांच्यासोबत माझी खूप चांगली बॉण्डिंग झाली आहे.

माझ्यासोबत अनेकजण विचित्र वागले
मीनल शहा हीदेखील माझी चांगली मैत्रीण बनल्याचे नीथाने सांगितले. माझ्यासोबत अनेकजण विचित्र वागले. मात्र बिग बॉसला सगळे काही माहित आहे. त्यांनी माझा खेळ चांगला झाल्याचे सांगितले आहे. बिग बॉसच्या घरामध्ये खेळामध्ये मीरा जगन्नाथ हिने नीथा शेट्टी हिला एका खेळातून बाहेर काढले होते. त्यावर ती भावुक झाली. त्यावेळेस ती खूप रडली होती. मात्र बिग बॉसने नंतर तिची समजूत काढली होती.

स्नेहा वाघला आयुष्यात पुन्हा कधीही भेटायला आवडणार नाही
नीता शेट्टी या मुलाखतीत म्हणाली की, माझे चांगले मित्र अनेक होतील. मात्र सगळ्यात टॉपला बिग बॉसच्या घरातला विशाल निकम हाच आहे. विशाल निकम एक माऊली सारखा अतिशय प्रामाणिक व्यक्ती आहे. तो पहिल्या दिवसापासूनच माझा चांगला मित्र बनलेला आहे. इतर सोनाली, विकास मीनल हे देखील मित्र आहेत. मात्र, विशाल स्वच्छ आहे. तो वेगळाच आहे. त्याचबरोबर तिने सांगितले की, मला स्नेहा वाघ हिला आयुष्यात पुन्हा कधीही भेटायला आवडणार नाही. याचे कारण बिग बॉसच्या घरातील सगळ्यांनाच माहित आहे आणि प्रेक्षकांना ही माहित आहे असेही तिने सांगितले.

Web Title: Bigg Boss Marathi 3: What Happens When Neetha Shetty Says- 'Never Want To Meet Sneha Waghla In Life'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.