Bigg Boss Marathi 3 : मीरा का झाली नाराज?; तिची आहे 'ही' तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 04:57 PM2021-12-13T16:57:48+5:302021-12-13T16:58:19+5:30
Bigg Boss Marathi 3 : मीराला घरच्या सदस्यांनी केले आहे नाराज आणि त्याविरुध्द तिची तक्रार आहे जी ती आज उत्कर्षला सांगताना आणि तिचा मुद्दा मांडताना दिसणार आहे.
बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi 3)च्या घरामध्ये आज उत्कर्ष मीरा चर्चा करताना दिसणार आहेत. मीराला घरच्या सदस्यांनी केले आहे नाराज आणि त्याविरुध्द तिची तक्रार आहे जी ती आज उत्कर्षला सांगताना आणि तिचा मुद्दा मांडताना दिसणार आहे.
मीरा उत्कर्षला सांगणार आहे, “जेव्हा टास्क होतो उमेदवारी आली इथून जय तू ये इथून विशाल येणार... बाकीच्या मुलीसुद्धा आहेत. याच्यावर मला सोनाली आणि मीनलबरोबर पण बोलायचं होतं पण मी नाही बोलले आजपर्यंत... जेव्हा सोनाली सुध्दा बोलायची ती स्वत:चं नावं कधी बोलत नव्हती रे किंवा मीनलचं सुध्दा आजपर्यंत नावं तिने पुढे नाही केले उमेदवारीसाठी किंवा कशासाठी सुध्दा. नेहमी तिला विशाल, विकास, जय उत्कर्ष हेच दिसायचे. का तू पण मुलगी आहेस ना तू तुझं नावं दे, मीनलचे नावं दे किंवा दुसर्याचे नावं दे. माझा हा प्रॉब्लेम होता. आणि मी म्हणून म्हटलं की सगळयांशी होता माझा प्रॉब्लेम.
'इथे सगळे जण मिळून खेळायला आले आहेत'
मीरा पुढे म्हणाली की, मी इथे फक्त मुलं असं नाही लिहिलं. इथे सगळे जण मिळून खेळायला आले आहेत आणि पुढे मुलांमध्ये हे जाणार मुलीममध्ये ... या गोष्टी करत होते ते मला नव्हतं पटतं. मुली असूनसुध्दा तुम्ही स्वत:ला पुढे न घेता दुसर्या मुलांना घेता आहे पुढे. माझी ही तक्रार होती. आता यावर उत्कर्ष किंवा जय काय म्हणाले त्यांनी कोणते मुद्दे मांडले आजच्या भागात कळेल.