Bigg Boss marathi 3: अन् विशाल निकमने दिलेलं वचन पाळलं, म्हणाला- माऊलींच्या पंढरपुरात...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 11:53 AM2021-12-31T11:53:29+5:302021-12-31T11:58:26+5:30

विशाल निकम (vishal nikam) हा यंदाच्या 'बिग बॉस मराठी'चं (bigg boss marathi 3) पर्वाचा विजेता ठरला आहे.

Bigg Boss Marathi 3 winner vishal nikam meet shivlila patil | Bigg Boss marathi 3: अन् विशाल निकमने दिलेलं वचन पाळलं, म्हणाला- माऊलींच्या पंढरपुरात...

Bigg Boss marathi 3: अन् विशाल निकमने दिलेलं वचन पाळलं, म्हणाला- माऊलींच्या पंढरपुरात...

googlenewsNext

छोट्या पडद्यावर यंदा 'बिग बॉस मराठी'चं (bigg boss marathi 3) तिसरं पर्व चांगलंच गाजलं. या पर्वात सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. अलिकडेच या शोचा ग्रँड फिनाले पार पडला. यावेळी विशाल निकम (vishal nikam) हा यंदाच्या पर्वाचा विजेता ठरला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगली आहे.

विशाल निकमने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याच्यासोबत शिवलीला दिसतेय. हा व्हिडीओ शेअर करताना विशालने लिहिले, बिग बॉसच्या घरामध्ये मी बोललो होतो, पहिलं जर कोणाला भेटीन तर शिवलीला ह्यांना आणि आज आमची भेट झाली ती सुद्धा मार्गशीर्ष महिन्यात....माऊलींच्या पंढरपुरात! ही भेट माऊलींनीच घडवून आणली असावी!

विशालने निकमने बिग बॉसच्या घरात दिलेला शब्द पाळला. घरात असताना त्याचे शिवलीलासोबत खास बॉन्डिंग झालं होतं. किर्तनकार शिवलीला पाटीलने   आजारपणाचे कारण सांगून एका आठवड्यातच बिग बॉसच्या घरातून काढता पाय घेतला होता.त्यावेळी विशालला अश्रू अनावर झाले होते. मात्र आज या घरातून बाहेर पडल्यानंतर त्यानं शिवलीलाची भेट घेतली आहे. चाहत्यांना देखील या दोघांना एकत्र पाहून आनंद झाला आहे.

 दरम्यान,'बिग बॉस'च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या विशालला खरी ओळख 'दख्खनचा राजा ज्योतिबा' (Dakkhancha Raja Jyotiba) या मालिकेमुळे मिळाली. या मालिकेत त्याने ज्योतिबाची भूमिका साकारली होती. त्याचसोबत त्याने 'धुमस', 'मिथून', 'साता जल्माच्या गाठी' यांसारख्या काही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Web Title: Bigg Boss Marathi 3 winner vishal nikam meet shivlila patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.