Bigg Boss Marathi 4 : यशश्री आणि अमृता धोंगडेमध्ये ALL IS NOT WELL !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 12:45 PM2022-11-04T12:45:49+5:302022-11-04T12:46:11+5:30

बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi 4)च्या घरामध्ये काल पार पडलेल्या टास्कमध्ये समृद्धी आणि यशश्रीला कॅप्टनपदाची उमेदवारी मिळाली आहे. आता या दोघींमध्ये कॅप्टन्सीचे कार्य पार पडणार आहे.

Bigg Boss Marathi 4 : ALL IS NOT WELL in Yashshree and Amrita Dhongde ! | Bigg Boss Marathi 4 : यशश्री आणि अमृता धोंगडेमध्ये ALL IS NOT WELL !

Bigg Boss Marathi 4 : यशश्री आणि अमृता धोंगडेमध्ये ALL IS NOT WELL !

googlenewsNext

बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi 4)च्या घरामध्ये काल पार पडलेल्या टास्कमध्ये समृद्धी आणि यशश्रीला मिळाली कॅप्टनपदाची उमेदवारी. आता या दोघींमध्ये पार पडणार आहे कॅप्टन्सीचे कार्य. याचबाबत आज यशश्री आणि तेजस्विनीमध्ये चर्चा रंगणार आहे. ज्यामध्ये यशश्रीचे म्हणणे आहे तेजस्विनी आणि ग्रुपने तिच्या बाजूने खेळावे... बघूया आज काय घडणार टास्कमध्ये. 

यशश्रीचे तेजस्विनीला म्हणणे आहे, "माझी अशी इच्छा आहे तुम्ही दोघींनी माझ्या बाजूने खेळावे. कारण जरी तुम्हांला मी तुमची वाटतं नसले तरीदेखील हि टीम अजूनही माझीच आहे. तेजस्विनी म्हणाली, मला तुझा फक्त एकचं प्रॉब्लेम आहे कि तू पटकन स्नॅप होतेस. त्यावर यशश्री म्हणाली, तुला पहिल्या आठवड्यापेक्षा  माझ्यात सुधारणा  दिसतं नाहीये ? तेजस्विनी म्हणाली, तू आता दोन तीन आठवडे तिथे खेळलीस. 

यशश्रीने अमृताला बजावून सांगितले कि, मी आता तुझ्याशी बोलतं नाहीये. तेजाशी बोलते आहे. त्यावर अमृता म्हणाली, तुम्ही दोघी बाजूला जाऊन बोला. आणि इथून वादाला सुरुवात झाली... यशश्री म्हणाली, तुला जायचं तर तू जा...  तू मला प्रत्येकवेळीस जा नाही बोलू शकतं. तू दोन वेळा मला जा बोलीस. अमृता म्हणाली, मी तुला कधी जा बोले... ही काय वेडी आहे का? ... यशश्रीचे फक्त एकंच म्हणणं आहे, तुला त्रास होत असेल तू जा मी आणि तेजा नाही जाणार... आता हा वाद अजून किती वाढला ? पुढे काय घडले ? हे जाणून घेण्यासाठी बिग बॉस मराठी सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता आणि शनिवार - रविवारी रात्री ९.३० वाजता पाहावे लागेल.

Web Title: Bigg Boss Marathi 4 : ALL IS NOT WELL in Yashshree and Amrita Dhongde !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.