Bigg Boss Marathi 4 : मी माझ्या प्रत्येक वाढदिवसाला रडते..., सांगताना भावुक झाली अपूर्वा नेमळेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 05:40 PM2022-12-26T17:40:38+5:302022-12-26T17:40:58+5:30

Bigg Boss Marathi 4, Apurva Nemlekar : उद्या 27 डिसेंबरला अपूर्वाचा वाढदिवस आहे. बिग बॉसच्या घरात तिचा हा वाढदिवस कसा साजरा होतो, ते बघूच. पण तूर्तास दरवर्षीचा वाढदिवस कसा असतो, हे तिने सांगितलं आहे.

Bigg Boss Marathi 4 apurva nemlekar talk about her birthday celebration | Bigg Boss Marathi 4 : मी माझ्या प्रत्येक वाढदिवसाला रडते..., सांगताना भावुक झाली अपूर्वा नेमळेकर

Bigg Boss Marathi 4 : मी माझ्या प्रत्येक वाढदिवसाला रडते..., सांगताना भावुक झाली अपूर्वा नेमळेकर

googlenewsNext

अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) ही टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेने अपूर्वाला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. सध्या ती बिग बॉस मराठीचा चौथा सीझन गाजवतेय. बिग बॉस मराठीच्या घरात अपूर्वाने आत्तापर्यंत अनेक खुलासे केलेत. अगदी पर्सनल लाईफबद्दलही ती बोलली. आता अपूर्वाने तिच्या वाढदिवसाबद्दल खुलासा केला आहे. होय, उद्या 27 डिसेंबरला अपूर्वाचा वाढदिवस आहे. तिचा हा वाढदिवस बिग बॉसच्या घरात कसा साजरा होतो, ते बघूच. पण तूर्तास दरवर्षीचा वाढदिवस कसा असतो, हे तिने सांगितलं आहे.

इन्स्टाग्रामवर तिने बिग बॉसच्या घरातला एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती तिच्या वाढदिवसाबद्दल बोलताना दिसत आहे. राखी सावंतसोबत गप्पा मारताना ती व्हिडीओत दिसते.

‘मंगळवारी माझा वाढदिवस आहे. माझ्या बर्थ डेला असं कुणी  एक्ससाइटेड नाही झालंय कधी. मी माझ्या दर बर्थ डेला रडते. असं काही ग्रेट घडलंच नाही वाढदिवसाला. मी त्या दिवशी घरीच असते. दुपारी घरीच जेवतो आणि रात्री कुटुंबासोबत जेवायला जातो,’असं ती म्हणते.

अपूर्वा सध्या सिंगल आहे. अर्थात तिचं आधी लग्न झालेलं आहे. 2014 मध्ये तिने रोहन देशपांडेसोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही.

 27 डिसेंबर 1988 रोजी मुंबईच्या दादर येथे जन्मलेल्या अपूर्वाने किंग जॉज विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केलं. यानंतर नॅशनल कॉलेज वांद्रे आणि रूपारेल कॉलेजात तिचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं. कॉलेजमध्ये असतानाच अपूवार्ला अ‍ॅक्टिंगच्या ऑफर येणं सुरु झालं होतं. पण अपूर्वाने या सगळ्या ऑफर धुडकावल्या होत्या. यांचं कारण म्हणजे,अभिनयात तिला कुठलाही रस नव्हता. खरं  तर तिला एमबीए करायचे होते. पण अपूर्वाच्या आई-वडिलांची मात्र मुलीने अभिनयात जावं अशी इच्छा होती. नियतीने त्यांची ही इच्छा पूर्ण केली. कदाचित त्यामुळेच, अभिनय क्षेत्रात काम करणे हे माझ्या नशिबातच लिहिलं होतं, असं अपूर्वा नेहमी म्हणते. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेद्वारे ती घराघरात पोहोचली. यात तिने शेवंता हे पात्र साकारले होते. 

Web Title: Bigg Boss Marathi 4 apurva nemlekar talk about her birthday celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.