Bigg Boss Marathi 4 : लग्नाचं वय झालं, तुला अजून कोणी मुलगा मिळाला नाही का? अक्षयच्या प्रश्नावर अपूर्वा नेमळेकरनं काय दिलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 06:19 PM2022-11-18T18:19:12+5:302022-11-18T18:19:54+5:30
Bigg Boss Marathi 4, Apurva Nemlekar : अपूर्वा सध्या ‘बिग बॉस मराठी 4’चं घर गाजवतेय. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये अपूर्वा स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. अपूर्वाची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली आणि तशी ती चर्चेत आली...
Bigg Boss Marathi 4 : ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचं नाव घेतलं की, दोनच चेहरे डोळ्यांपुढे येतात, ते म्हणजे अण्णा आणि शेवंता. शेवंताची भूमिका साकारली होती अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ( Apurva Nemlekar) हिने. आता हीच अपूर्वा ‘बिग बॉस मराठी 4’चं घर गाजवतेय. होय, बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये अपूर्वा स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. अपूर्वाची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली आणि तशी ती चर्चेत आली.
पहिल्याच आठवड्यात तिने घरात तुफान राडा घातला. अनेकांशी तिचं वाजलं. आता बिग बॉस मराठीच्या घरात अपूर्वाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. होय, अपूर्वा तिच्या लग्नाबद्दल बोलली.
अपूर्वा, अक्षय व अमृता देशमुख तिघंही बिग बॉसच्या घरात गप्पा मारताना दिसले. गप्पांच्या ओघात अक्षयने अपूर्वाला तिच्या लग्नाबद्दल छेडलं. माझ्या इतकी शांत मुलगी या घरात कोणीच नाही. तरीही मलाच सगळे बोलतात, असं अपूर्वा म्हणाली. यावर ‘लग्नाचं वय झालं तरी तुला अजुन कोणी मुलगा मिळाला नाही का?’असं अक्षयने गमतीने तिला विचारलं. या प्रश्नावर अपूर्वाने मजेशीर उत्तर दिलं. ‘अजून हवा तसा खजिना मला मिळालेला नाही. मी खजिना शोधतेय पण अजूनही मला तो सापडत नाहीये,’ असं ती म्हणाली. लग्न करताना मी मुलाला कोणत्याच अटी घालणार नाही, असंही तिने सांगितलं.
अपूर्वा सध्या सिंगल आहे. अर्थात तिचं आधी लग्न झालेलं आहे. 2014 मध्ये तिने रोहन देशपांडेसोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही.
27 डिसेंबर 1988 रोजी मुंबईच्या दादर येथे जन्मलेल्या अपूर्वाने किंग जॉज विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केलं. यानंतर नॅशनल कॉलेज वांद्रे आणि रूपारेल कॉलेजात तिचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं. कॉलेजमध्ये असतानाच अपूवार्ला अॅक्टिंगच्या ऑफर येणं सुरु झालं होतं. पण अपूर्वाने या सगळ्या ऑफर धुडकावल्या होत्या. यांचं कारण म्हणजे,अभिनयात तिला कुठलाही रस नव्हता. खरं तर तिला एमबीए करायचे होते. पण अपूर्वाच्या आई-वडिलांची मात्र मुलीने अभिनयात जावं अशी इच्छा होती. नियतीने त्यांची ही इच्छा पूर्ण केली. कदाचित त्यामुळेच, अभिनय क्षेत्रात काम करणे हे माझ्या नशिबातच लिहिलं होतं, असं अपूर्वा नेहमी म्हणते.