Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात रुचिरा - अपूर्वा मध्ये सुरु झालं COLD WAR !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 12:35 PM2022-11-08T12:35:32+5:302022-11-08T12:38:05+5:30

काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये "विषय END" हे नॉमिनेशन कार्य पार पडले.

Bigg Boss Marathi 4: COLD WAR started in Bigg Boss house between Ruchira and Apurva Nemlekar ! | Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात रुचिरा - अपूर्वा मध्ये सुरु झालं COLD WAR !

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात रुचिरा - अपूर्वा मध्ये सुरु झालं COLD WAR !

googlenewsNext

काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये "विषय END" हे नॉमिनेशन कार्य पार पडले. या आठवड्यात घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेत यशश्री, स्नेहलता, प्रसाद, रुचिरा, अमृता धोंगडे आणि तेजस्विनी हे सदस्य नॉमिनेट झाले. अक्षय आणि टीम B ने मिळून रुचिराला नॉमिनेट केले. आज रुचिरा - रोहितमध्ये तसेच अपूर्वा आणि समृद्धी मध्ये चर्चा रंगली आहे. रुचिरा आणि अपूर्वा मध्ये सुरु झालं क्लोड वॉर. 


अपूर्वा समृद्धीला सांगताना दिसणार आहे, माझ्या आणि प्रसादच्या वादामध्ये मी देशमुखला काय म्हणाले तू यापासून दूर रहा.  विषय माझा आणि त्याचा आहे आम्ही ते बघून घेऊ तुला विचारला आहे का? तुझा मुद्दा आला तेव्हा आपण बोलू. मग तसं मी रिस्पेक्ट केलं तुम्ही दोघ बोलून घ्या जेव्हा तुमचं होईल तेव्हा मला सांग. मी तिला काय बोले रात्री तुला बोलावंस वाटलं कि सांग मला पण आता नाही मला झोप येते आहे उद्या बोलू. रुचिरा आणि रोहितची नॉमिनेशन वरून चर्चा रंगली आहे. 

रुचिराचे म्हणणे आहे, जो निकष दिलाच नव्हता साप्ताहिक कार्याची कामगिरी, त्या नसलेल्या निकषावर त्यांनी मला नॉमिनेट केलं आहे. अपूर्वा समृद्धीला सांगताना दिसणार आहे, जेव्हा मी नॉमिनेट झाले होते तेव्हा किती लोक आली होती. किती लोकं माझ्या बाजूने बोलले होते. मी माझ्या प्रॉब्लेमला केलं ना डील माझं. समृद्धीचे म्हणणे आहे, सगळेच करतात मी पण केलं. रुचिरा रोहितला सांगताना दिसणार आहे, नेहेमी रुचिरा संयम ठेवला आहे... माझे patience काढताना ती एक वाक्य म्हणाली माझ्यात संयम नव्हता. पुढे काय झालं हे आजच्या भागात कळेल. 

Web Title: Bigg Boss Marathi 4: COLD WAR started in Bigg Boss house between Ruchira and Apurva Nemlekar !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.