Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीत पहिल्यांदाच 'कपल एन्ट्री'; 'माझ्या नवऱ्याची बायको फेम' अभिनेत्रीनं प्रियकरासोबत घेतली एन्ट्री! 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 10:14 PM2022-10-02T22:14:57+5:302022-10-02T22:16:28+5:30

Bigg Boss Marathi 4: 'बिग बॉस' मराठीत यंदा एकामागोमाग एक धक्के दिले जात आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींची बांधणी करत यंदाचं सीझन हटके करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Bigg Boss Marathi 4 Couple Entry for the first time in Bigg Boss Marathi ruchira jadhav and dr rohit shinde | Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीत पहिल्यांदाच 'कपल एन्ट्री'; 'माझ्या नवऱ्याची बायको फेम' अभिनेत्रीनं प्रियकरासोबत घेतली एन्ट्री! 

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीत पहिल्यांदाच 'कपल एन्ट्री'; 'माझ्या नवऱ्याची बायको फेम' अभिनेत्रीनं प्रियकरासोबत घेतली एन्ट्री! 

googlenewsNext

Bigg Boss Marathi 4: 'बिग बॉस' मराठीत यंदा एकामागोमाग एक धक्के दिले जात आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींची बांधणी करत यंदाचं सीझन हटके करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यातच बिग बॉस मराठीच्या आजवरच्या सीझनमधली पहिलीच कपल एन्ट्री यंदाच्या सीझनमध्ये दाखल झाली आहे. 

एकच 'फाइट' अन् वातावरण टाइट! 'बिग बॉस मराठी'च्या इतिहासात आजवरचा सर्वात उंच स्पर्धक दाखल!

'माझ्या नवऱ्याची बायको' या गाजलेल्या टेलिव्हिजन मालिकेत माया नावाचं पात्र साकारलेली अभिनेत्री रुचिरा जाधव दाखल झाली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे रुचिरा बिग बॉसमध्ये एकटीच दाखल झालेली नाही. तर तिनं तिच्या प्रियकरासोबत घरात एन्ट्री घेतली आहे. डॉ. रोहित शिंदे बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून दाखल झाला आहे. रोहित शिंदे आणि रुचिरा जाधव वैयक्तिक आयुष्यात एकमेकांचे सोबती आहेत. आता ते बिग बॉसच्या घरातही एकत्र दाखल झाले आहेत. पण डॉ. रोहित शिंदे याची ओळख फक्त रुचिराचा प्रियकर एवढीच नाही. तर रोहित शिंदे देखील एक स्टार आहे. त्याला मॉडेलिंगची विशेष आवड आहे. त्याने ‘मिस्टर इंडिया मॅन ऑफ द ग्लोब इंटरनॅशनल’साठी मॉडेलिंग केलं आहे.

Web Title: Bigg Boss Marathi 4 Couple Entry for the first time in Bigg Boss Marathi ruchira jadhav and dr rohit shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.