Bigg Boss Marathi 4, Day 10 : बिग बॉसचं घर बनलं कुस्तीचा आखाडा, किरण माने म्हणाला-लाज बाळगा....
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 16:31 IST2022-10-12T16:25:54+5:302022-10-12T16:31:06+5:30
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये BB विमानतळ बनलं आहे कुस्तीचा आखाडा.

Bigg Boss Marathi 4, Day 10 : बिग बॉसचं घर बनलं कुस्तीचा आखाडा, किरण माने म्हणाला-लाज बाळगा....
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये BB विमानतळ बनलं आहे कुस्तीचा आखाडा. घरामध्ये सुरु आहे “गेले उडत” हे साप्ताहिक कार्य. मेघा ताईने केला समोरच्या टीमवर आरोप "खाली दोन दोन बॅग धरून ठेवल्या आहेत ते दिसत नाहीये. त्यावर किरण माने यांचे म्हणणे आहे "मी बघितलं आहे, कॅमेराने देखील बघितलं आहे. बॅगा अशा वाटलेल्या आहेत क्लिअर दिसतं आहे आणि आम्हाला सांगतं आहेत.
कॅमेरा बघतो आहे, लाज बाळगा... तर दुसरीकडे, प्रसाद आणि अक्षय यंनी घराला कुस्तीचा आखाडाच बनवला.. समृद्धीचे म्हणणे आहे प्रसाद सोडून दे अक्षयने सर्वात पहिली बॅग घेतली आहे. घरातील काही सदस्य देखील प्रसादला सांगत आहेत बॅग सोडून दे. पण दोघे हि बॅग सोफायला तयार नाहीये हे दिसून आले.
तेजस्विनीचे रुचिराला म्हणणे आहे तू दिशाभूल का करतेस ? आता रुचिरा आपली बाजू कशी मांडणार कळेलच. कोणाची बॅग कोणी घेतली यावरून सदस्य एकमेकांवर भिडले. बघूया आजच्या भागामध्ये पुढे काय घडले.