Bigg Boss Marathi 4, Day 11 : मिसेस मुख्यमंत्री फेम अमृता धोंगडेचा चढला पारा, म्हणाली- ही पोरगी एवढी खोटारडी.....
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 15:50 IST2022-10-13T15:44:25+5:302022-10-13T15:50:47+5:30
काल बिग बॉसच्या घरात अमृता धोंगडेला अश्रू अनावर झाले होते. आज मात्र तिचा पारा चांगलाच चढलेले पाहिला मिळणार आहे.

Bigg Boss Marathi 4, Day 11 : मिसेस मुख्यमंत्री फेम अमृता धोंगडेचा चढला पारा, म्हणाली- ही पोरगी एवढी खोटारडी.....
काल बिग बॉसच्या घरात अमृता धोंगडेला अश्रू अनावर झाले होते. किरण माने (Kiran Mane) तिची समजूत काढताना दिसला तर प्रसाद तिला हसवण्याचा प्रयत्न करताना दिसला. आज मात्र घरात अमृता आणि याश्रीमध्ये जोरदार भांडण होणार आहे. आज अमृता धोंगडे आणि याश्री मसुरकर मध्ये चहा बनवण्यावरून होणार राडा.
कोण खरं आणि कोण खोटं बोलतं आहे ते कळेलच. पण, सकाळची सुरुवात यांच्यातील खंडाजंगीने होणार. यशश्रीचे म्हणणे आहे, "मी तेजुला सांगितलं मला सकाळचा चहा लागतो माझी कामं झाली आहेत तर तू करून देशील का? तेजस्विनी ठीक आहे म्हणाली. मी अमृताला बोले मी तेजुला सांगितलं आहे चहा बनवायला कारण सकाळचं जरा आहे त्याच्यावरून ते सुरु झालं".
यशश्री म्हणाली अमृताला बाहेर जाऊन बघ तू... आणि हे ऐकताच अमृता म्हणाली, "आई शप्पथ, माझं जेवण समोर आहे आयुष्यात मी खोटं नाही बोलणार, सॅम हि पोरगी एवढी खोटारडी आहे, हि काय बोली मी तुला सांगू... आता बघूया अमृताचं यावर काय म्हणणं आहे आणि ती तिची बाजू कशी मांडेल.बघूया आजच्या भागामध्ये पुढे काय घडले.