Bigg Boss Marathi 4, Day 11 : बिग बॉसच्या घरामध्ये रंगणार पार्किंगचा किंग हे कॅप्टन्सी कार्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 01:08 PM2022-10-13T13:08:36+5:302022-10-13T13:09:25+5:30

Bigg Boss Marathi 4: बिग बॉसच्या घरात पहिल्या आठवड्यात कॅप्टन बनण्याचा मान समृद्धी जाधवने मिळवला होता. त्यानंतर आता बिग बॉस मराठीच्या घरातील दुसऱ्या कॅप्टनची निवड करण्यात येणार आहे

Bigg Boss Marathi 4, Day 11 : The captaincy task of parking king will be played in the house of Bigg Boss! | Bigg Boss Marathi 4, Day 11 : बिग बॉसच्या घरामध्ये रंगणार पार्किंगचा किंग हे कॅप्टन्सी कार्य!

Bigg Boss Marathi 4, Day 11 : बिग बॉसच्या घरामध्ये रंगणार पार्किंगचा किंग हे कॅप्टन्सी कार्य!

googlenewsNext

बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi 4) शो म्हटलं की टास्क, वाद, भांडण आणि राडे आलेच. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाला सुरुवात होऊन १० दिवस उलटले असून आता हळूहळू कलाकारांचे खरे चेहरे लोकांसमोर येत आहे. कोण आपल्यावर गेम करतंय, कोण मनापासून साथ देतय याची प्रचिती स्पर्धकांना येऊ लागली आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे घरात लवकरच गट पडतील असे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आता घरात खरे ट्विस्ट येतील असे दिसते आहे. त्यातही दुसऱ्या आठवड्यात घराचा कॅप्टन कोण होणार आहे, यासाठी स्पर्धकांमध्ये चुरस लागली आहे.

बिग बॉसच्या घरात पहिल्या आठवड्यात कॅप्टन बनण्याचा मान समृद्धी जाधवने मिळवला होता. जो सदस्य कॅप्टन होतो तो नॉमिनेशन पासून सेफ होतो. त्या आठवड्यात तो सुरक्षित असल्यामुळे घराबाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येक सदस्य कॅप्टन होण्यासाठी झटत असतो. आता बिग बॉस मराठीच्या घरातील दुसऱ्या कॅप्टनची निवड करण्यात येणार आहे. यासाठी पार्किंग किंग हे कॅप्टन्सी कार्य दिले आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पार्किंगचा किंग हे कॅप्टीन्सी कार्य आज रंगणार आहे. काल कॅप्टन पदासाठी दोन उमेदवार रोहित आणि अक्षय मिळाले आहेत. आज या दोघांमध्ये कॅप्टन्सी कार्य रंगणार आहे. कोण बनणार घराचा नवा कॅप्टन हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. कार्य म्हटलं म्हणजे भांडणं, मारामारी, ही आलीच. आज हे कार्य सदस्य कसे पार पाडतील हे आजच्या भागामध्ये कळेल. पुढे काय घडणार, हे आजच्या भागामध्ये कळेल. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वाजता कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

Web Title: Bigg Boss Marathi 4, Day 11 : The captaincy task of parking king will be played in the house of Bigg Boss!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.