Bigg Boss Marathi 4, Day 15 : आपणं आपलं पर्सनल लेव्हलला खेळूया..., असं का म्हणतेय यशश्री
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 03:34 PM2022-10-18T15:34:01+5:302022-10-18T15:40:26+5:30
घरातील सदस्यांमध्ये रुसवे फुगवे, धमाल मस्ती पाहायला मिळत आहे. दरम्यान आज १५ व्यादिवशी घरात चर्चासत्र भरणार आहे.
बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi 4)चा चौथा सीझन सुरू होऊन १४ दिवस उलटले आहेत. आता हा शो रंजक वळणावर आला आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील पहिला सदस्य निखिल राजेशिर्के नुकताच घराबाहेर पडला आहे. घरातील सदस्यांमध्ये रुसवे फुगवे, धमाल मस्ती पाहायला मिळत आहे. दरम्यान आज १५ व्यादिवशी घरात चर्चासत्र भरणार आहे.
आज बिग बॉस मराठीच्या घरात अपूर्वा, यशश्री, त्रिशूल, समृद्धी, मेघा, अक्षय आणि रोहित यांच्यामध्ये चर्चासत्र भरणार आहे. ज्यामध्ये अपूर्वा, यशश्री आणि समृद्धी आपआपले मुद्दे मांडताना दिसणार आहेत. अपूर्वाचे म्हणणे आहे, "आपल्याकडे चॉइसेस आहेत टीम बनवण्याचे तर मला असं वाटतं यशश्री, मी आणि मेघाताई यांना खेळण्याचे प्राधान्य दिले पाहिजे. कारण आम्हांला आमच्या प्रेक्षकांना... कारण आम्ही तिथे (नॉमिनेशनमध्ये) डिसर्व्हचं करत नाही.
आम्ही तिघेही चर्चतलेच विषय होतो कायम... समृद्धीचे म्हणणे आहे, कॅप्टन्सीचे काही असेल ना तर मी खेळणार, कारण मला खरंच खेळायचं आहे. त्यावर यशश्री म्हणाली, “आपणं आपलं पर्सनल लेव्हलला खेळूया, ग्रुपचा टास्क असेल तेव्हा ग्रुपबरोबर खेळूया. कारण, आपण धरून चालूया जर माझ्याकडे तुमच्या दोघींची (मेघा ताई आणि अपूर्वा) बॅग असेल तर मी तुम्हांला सेफ करून स्वतः त्याग नाही करणार हे माझं खूप क्लिअर आहे आणि तुमचं देखील तसंच असायला हवं असं मला वाटतं."