Bigg Boss Marathi 4, Day 17 : बिग बॉसच्या घरातील कार्यादरम्यान सदस्यांची सुरु आहे लपवा छपवी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 13:51 IST2022-10-19T13:47:35+5:302022-10-19T13:51:45+5:30
Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठी ४च्या घरातील सदस्यांचा आज १७वा दिवस आहे. घरामध्ये भांडणांसोबत मजामस्तीदेखील पाहायला मिळत आहे. बिग बॉस यांनी सदस्यांवर जबरा फॅन हे कार्य सोपवले आहे.

Bigg Boss Marathi 4, Day 17 : बिग बॉसच्या घरातील कार्यादरम्यान सदस्यांची सुरु आहे लपवा छपवी
बिग बॉस मराठी ४(Bigg Boss Marathi 4)च्या घरातील सदस्यांचा आज १७वा दिवस आहे. घरामध्ये भांडणांसोबत मजामस्तीदेखील पाहायला मिळत आहे. बिग बॉस यांनी सदस्यांवर जबरा फॅन हे कार्य सोपवले आहे. स्टार परफॉर्मर तेजस्विनी आणि समृद्धी यांच्या ग्रुपमध्ये कार्या दरम्यान फॅन्सना मिळणार आहे कॅप्टन्सीची उमेदवारी आता ती कोणाला मिळेल हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. कार्या दरम्यान घरामध्ये जोरदार राडे होणार आहेत.
"जबरा फॅन" या कार्या दरम्यान तेजस्विनी आणि समृद्धीची टीम त्यांनी बनवलेले स्टार लपवत आहेत म्हणजेच दुसऱ्या टीम पासून सुरक्षित ठेवत आहेत. आता या टास्क मध्ये कोणाचे स्टार राहणार सुरक्षित आणि कोणत्या फॅन फॅनला मिळणार स्टार परफॉर्मर कडून हार्ट बघूया आजच्या भागामध्ये.
या टास्कमध्ये अजून काय घडले कोणता ग्रुप विजेता ठरला ? कोणाला उमेदवारी मिळाली बघूया आजच्या भागामध्ये. अजून घरात काय काय घडले हे जाणून घेण्यासाठी बिग बॉस मराठी सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता आणि शनि - रवि रात्री ९.३० वाजता पाहावे लागेल.