Bigg Boss Marathi 4, Day 17 : बिग बॉसच्या घरात यशश्री करणार त्रिशूलची कानउघाडणी, विचारणार त्याला जाब
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 18:08 IST2022-10-19T17:55:40+5:302022-10-19T18:08:34+5:30
Bigg Boss Marathi 4: बिग बॉसच्या घरात यशश्री करणार त्रिशूलची कानउघाडणी करताना दिसणार आहे.

Bigg Boss Marathi 4, Day 17 : बिग बॉसच्या घरात यशश्री करणार त्रिशूलची कानउघाडणी, विचारणार त्याला जाब
बिग बॉस मराठीचा चौथा सीझन (Bigg Boss Marathi Season 4) पहिल्या दिवसापासून चर्चेत आला आहे. आता या सीझनमधील पहिले एलिमिनेशन झाले असल्यामुळे स्पर्धकांमध्ये चुरस आणि चिंता दोन्हीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे घरात भांडणांसोबत धमालमस्तीदेखील पाहायला मिळत असते. दरम्यान आज घरात यशश्री करणार त्रिशूलची कानउघाडणी. ती त्याला जाब विचारताना दिसणार आहे.
यशश्री त्रिशूलला विचारणार आहे, मी त्यादिवशी पण बोले तुला त्रिशूल मी तुला जे सांगते ते तुझ्यात आणि माझ्यात आहे तुला ती बाजू तिकडे जाऊन मांडण्याची गरज नाही, तू काय त्या ग्रुपचा चमचा आहे का? नाही ना? तुझ्या वेळेला किती लोकांचा हात वर झाला होता? फक्त माझा… का? कारण बॅगेच्या टास्कच्या वेळेला तुला काढलं होतं तेव्हा तू तुझी बाजू मांडली नव्हती. जरी त्याला तुझ्या त्यागाचं नावं दिलं जात असेल तरी तो तुझा वीकनेस म्हणून बोला जातं आहे. आज पण तू बाहेर निघालास आणि मला दिलंस तो अपूर्वाला वीकनेस वाटला असणार. तू काहीच एक्सप्लेन करायला नाही जाणार. आपण एक्सप्लेन करायला गेलो कि आपण वीक दिसतो. तू माझी बाजू मांडायला जायचं नाहीस.
बिग बॉसच्या घरातील सदस्यांमध्ये बऱ्याचदा चर्चा होताना दिसते. अशीच चर्चा आजदेखील होताना दिसणार आहे. अजून घरात काय काय घडले हे आपल्या आजच्या भागात कळेलच.