Bigg Boss Marathi 4 : या कारणामुळे अपूर्वा नेमळेकर आणि किरण मानेमध्ये झाले मतभेद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 15:22 IST2022-12-16T15:21:28+5:302022-12-16T15:22:01+5:30
Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या घरात पुष्कर जोग आणि सोनाली कुलकर्णी सदस्यांवर सोपवणार आहेत चैन पडेना आम्हांला हे कॅप्टन्सी कार्य

Bigg Boss Marathi 4 : या कारणामुळे अपूर्वा नेमळेकर आणि किरण मानेमध्ये झाले मतभेद
बिग बॉस मराठीचा चौथा सीझन (Bigg Boss Marathi 4) रंजक वळणावर आला आहे. घरातील सदस्यांमध्ये मैत्री, धमाल मस्ती, रुसवेफुगवे, भांडणं आणि मतभेद पाहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीच्या घरात पुष्कर जोग आणि सोनाली कुलकर्णी यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी ते सदस्यांवर चैन पडेना आम्हांला हे कॅप्टन्सी कार्य सोपवणार आहेत. आता यात कोण बाजी मारणार? आणि कोण बनणार घराचा नवा कॅप्टन? की हे कार्य देखील सदस्य रद्द करणार ? हे आजच्या भागात कळेलच.
चैन पडेना आम्हाला या कार्यादरम्यान अपूर्वा नेमळेकर आणि किरण माने यांच्यामध्ये मतभेद होणार आहेत. अपूर्वा किरणला सांगताना दिसणार आहे, मला इतकंच कळतं तुझ्या माझ्यात कितीही वाद झाला तरी तू जेव्हा जेव्हा कॅप्टन्सीसाठी उभा राहिला आहे किंवा जेव्हा तू खेळायला जातो ना तेव्हा तेव्हा मी आणि अक्षय तुझ्यासाठी उभे राहतो. माझ्यावरचा राग आहे ना तो माझ्यावर राहू दे. मी जेव्हा पण खेळत असतेना...
किरण यांचे म्हणणे आहे, तुझ्यावर राग नाही माझा. अपूर्वा म्हणाली, जेव्हा मी खेळत असते ना मला कुठंलाही सदस्य चिअर अप करत नाही हे मी पहिल्या दिवसापासून मान्य केले आहे. पण जेव्हा अक्षय खेळतो तेव्हा अख्खं घर त्याच्या विरुध्द्व खेळतं आहे... तुझ्याकडून ही अपेक्षा नाही, बाकी मला काही म्हणायचं नाही. चूक तुझी नाही माझी आहे की मी अपेक्षा करते. मी काही फोर्स नाही करू शकतं. फक्त माझा राग माझ्यावर असू दे.