Bigg Boss Marathi 4: 'एण्ड ऑफ द चाप्टर...', ग्रॅण्ड फिनालेत गैरहजर असलेल्या रुचिरा जाधवची 'ती' पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 10:12 PM2023-01-08T22:12:38+5:302023-01-08T22:12:57+5:30
Ruchira Jadhav: एकीकडे बिग बॉस मराठी ४चा ग्रॅण्ड फिनाले रंगलेला असताना दुसरीकडे रुचिरा गैरहजर राहिली असली तरी सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
बिग बॉस मराठीचं चौथं पर्व आज प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या पर्वाचा महाअंतिम सोहळा सध्या सुरू असून या सोहळ्यात कोण विजेता ठरणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. या महाअंतिम सोहळ्याला सुरूवातीपासून सहभागी झालेले १६ सदस्य आणि आधीच्या सीझनमधील काही स्पर्धकही पाहायला मिळाले. मात्र यात या सीझनमध्ये रुचिरा जाधव आणि डॉ. रोहित शिंदे हे कपल गैरहजर आहे. रियुनियनमध्ये हे कपल पाहायला मिळाले होते. दरम्यान एकीकडे बिग बॉस मराठी ४चा ग्रॅण्ड फिनाले रंगलेला असताना दुसरीकडे रुचिरा गैरहजर राहिली असली तरी सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
रुचिरा जाधव हिने डायरीत लिहिलेल्या गोष्टीचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, प्रत्येक क्षणी जेव्हा मला असे वाटले की, हा शेवट होईल, #ruchirasay मी ठरवले की "हा इंटरव्हल पॉइंट आहे" ! प्रेम, विश्वास आणि शांती. आयुष्य अनमोल आहे… तुम्हीही आहात!!
रुचिराने शेअर केलेल्या डायरीच्या फोटोत तिने लिहिले की, एण्ड ऑफ द चाप्टर...एण्ड ऑफ द जर्नी... यात तिने आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल लिहिले आहे. यात तिने २०२१ मध्ये बिग बॉससाठी विचारले होते पण बहिणीच्या लग्नामुळे मला जमले नसल्याचे सांगितले. मात्र चौथ्या सीझनमध्ये एका ट्विस्टसहित विचारण्यात आले जो फक्त याच सीझनाच नाही तर आतापर्यंतच्या सगळ्याच सीझनचा मोठा ट्विस्ट असणार होता. मी आनंदी होते, थोडे दडपण होते. पण विश्वासही होता. कारण पर्सनल लाईफ नॅशनल टेलिव्हिजनवर एक्झपोझ करणं माझ्यासाठी चॅलेजिंग होत असं रुचिरानं म्हटलं.
या पोस्टमध्ये काही गोष्टी ठरवल्या होत्या, खूप स्वप्न बघितली होती, जी फक्त माझ्यासाठी व्हती. पण हा रिएलिटी शो होता जो माणसाच्या खरा स्वभाव जगासमोर आणतो, असे म्हटलंय. तसेच तिने मला समजून घ्या असं माझं म्हणणं नाही. कारण तुम्हाला पूर्ण गोष्टी माहित नाहीत. अजूनही एक महिला, अभिनेत्री आणि पब्लिक फिगर असल्यामुळे खूप गोष्टी बोलायच्या टाळतेय. अजूनही संयम बाळगतेय. प्रतिष्ठा जपतेय पण एक माणूस म्हणून मला पण जाणवतंय. कधी कधी गुदमरायला होतंय. फक्त एवढेच बोलेन जो तुमच्या स्वप्नांना महत्त्व देत नाही त्याच्यासाठी तुमचं जीवन वाया घालवण्यापेक्षा आणि स्वप्न भंगून जाण्यापेक्षा पुन्हा एकदा स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमची स्वप्न जगा.
रुचिराची ही पोस्ट आणि महाअंतिम सोहळ्यातील गैरहजरी तिच्यात आणि रोहित शिंदे यांच्या नात्यातील कडवटपणा अद्याप संपलेला नसल्याचे सांगते. त्यामुळे त्यांचे हे नाते टिकेल का, हे आगामी भागातच कळेल.