Bigg boss marathi 4 : बिग बॉस फेम तेजस्विनीच्या हाताची झाली सर्जरी?; म्हणाली-माझ्या तब्येतीची...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 05:34 PM2022-12-13T17:34:24+5:302022-12-13T17:38:34+5:30
बिग बॉस मराठीचा चौथा सीझन (Bigg Boss Marathi 4)मधून तेजस्विनी लोणारी(Tejaswini Lonari)ला दुखापतीमुळे एक्झिट घ्यावी लागली.
बिग बॉस मराठीचा चौथा सीझन (Bigg Boss Marathi 4)मधून तेजस्विनी लोणारी(Tejaswini Lonari)ला दुखापतीमुळे एक्झिट घ्यावी लागली. यानंतर तेजस्विनीच्या चाहत्यांनी आपली नाराजी देखील व्यक्त केली. टास्क दरम्यान झालेल्या हाताला दुखापतीमुळे तिला घरातून बाहेर पडावं लागलं. घरातून बाहेर आल्यानंतर तेजस्विनीने हाताची ट्रिटमेंट देखील सुरु केली. आता तेजस्विनीची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. यात तिने आपल्या हाताबाबतची अपडेट दिली आहे.
तेजस्विनीच्या हाताची अपेडट अनेकांनी तिला सोशल मीडियावर मेसेज करून विचारली होती. चाहत्यांची काळजी लक्षात घेऊन तेस्विनीनं स्वत: याबद्दल सविस्तर पोस्ट लिहून अपडेट दिली आहे. तेजस्विनीनं पोस्टमध्ये म्हटलंय, 'माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींनो तुम्ही खूप मजेत असाल अशी मी अपेक्षा करते. माझ्या तब्येतीची विचारपूस करणारे अनेक संदेश मला तुमच्याकडून मिळाले. माझ्या बोटाची शस्त्रक्रिया झाल्याचा गैरसमज अनेकांना होत असल्याचे मला समजले. मुळात, तसं काहीही झालं नाही'.
माझ्या हाताला किरकोळ फ्रॅक्चर झाले असून, ते काही आठवड्यात भरून निघेल. त्यामुळे शस्त्रक्रियेची गरज नाही असे माझ्या डॉक्टरांनी सांगितले. आता तीन आठवडे झाले असून बऱ्यापैकी सुधारणादेखील होत आहे. लवकरच एकदम तेजस्वी तेजस्विनी तुम्हाला परत एकदा दिसून येईल. तुमचं माझ्यावरच प्रेम असंच राहू द्या.
तेजस्विनीने याआधी काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. देवमाणूस 2 ही तिची पहिलीच मालिका आहे.तेजस्विनीने आपल्या करिअरची सुरूवात साऊथ सिनेमांमधून केली होती. त्यानंतर तिने मराठी सिनेमे केलेत. दोघांत तिसरा आता सगळं विसरा या सिनेमात ती मकरंद अनासपुरे यांच्यासोबत दिसली होती.मराठी सिनेमे कमी केले असले तरी बर्नी, चिनू, नो प्रॉब्लेम इन यासारख्या चित्रपटांमधून तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.हिंदी मालिकेत देखील तिने काम केलं आहे. नितीन चंद्रकांत देसाई यांच्या एका हिंदी मालिकेत तेजस्विनी लीड रोलमध्ये दिसली होती.