Bigg Boss Marathi 4 : अश्रूंचा बांध फुटला ! रडायचं नाही आता लढायचं...अमृताच्या धोंगडेच्या वडिलांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 15:44 IST2022-12-21T15:41:43+5:302022-12-21T15:44:59+5:30
'बिग बॉस मराठी' मध्ये सध्याचा आठवडा हा स्पर्धकांसाठी फॅमिली वीक आहे. स्पर्धकांना त्यांचे कुटुंबीय भेटायला येत आहेत.

Bigg Boss Marathi 4 : अश्रूंचा बांध फुटला ! रडायचं नाही आता लढायचं...अमृताच्या धोंगडेच्या वडिलांचा सल्ला
Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी' (Big Boss Marathi) सध्या रंजक वळणावर आहे. स्पर्धेतील रंजकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता टॉप ५ स्पर्धकांसाठी ३ आठवडे शिल्लक आहेत. जसेजसे पर्व शेवटाकडे जात आहे स्पर्धक भावूक झाले आहेत. सध्याचा आठवडा हा स्पर्धकांसाठी फॅमिली वीक आहे. स्पर्धकांना त्यांचे कुटुंबीय भेटायला येत आहेत.
कलर्सने पोस्ट केलेल्या एका प्रोमोमध्ये अमृता धोंगडेचे (Amruta Dhongade) आई वडील आल्याचे दिसत आहे. आई वडिलांना बघून अमृताच्या अश्रूंचा बांध फुटतो. मात्र तिचे बाबा तिला मोलाचा सल्ला देऊन जातात. 'रडायचं नाही तर आता लढायचं आहे' असं अमृताला सांगताना दिसत आहे. तर अमृताची आई तिचे डोळे पुसते. 'तू खंबीर आहेस छान करत आहेस ट्रॉफी मिळणारंच असं सगळेच म्हणताएत' असं म्हणत तिला धीर देताना दिसत आहे.
अमृताच्या या व्हिडिओ वर चाहत्यांनीहीव प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेता पुष्कर जोगनेही व्हिडिओवर कमेंट केली आहे. 'बिग बॉस सिझन १ चा मला माझा फॅमिली वीक एपिसोड आठवला. हे क्षण खूपच अनमोल असतात' अशा शब्दात पुष्कर जोग व्यक्त झाला आहे.