Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात अक्षय आणि प्रसादमध्ये तुफान राडा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 14:32 IST2022-12-08T14:12:12+5:302022-12-08T14:32:47+5:30
घराचा कॅप्टन अक्षय आणि प्रसादचा तुफान राडा होणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दोघे एकमेकांना मारायला धावून जात आहेत असे दिसून आले.

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात अक्षय आणि प्रसादमध्ये तुफान राडा!
बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi 4)च्या घरात काल BB High School भरली काही सदस्य विद्यार्थीच्या भूमिकेत तर काही शिक्षकांच्या भूमिकेत दिसले. बिग बॉस मराठीच्या घरात ऐरव्ही शांत आणि गोंधळलेला दिसणारा प्रसाद आज मात्र भलताच रागात दिसणार आहे.
घराचा कॅप्टन अक्षय आणि प्रसादचा तुफान राडा होणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दोघे एकमेकांना मारायला धावून जात आहेत असे दिसून आले. घरातील सदस्य त्यांना थांबण्याचा प्रयत्न देखील करत आहेत.
प्रसाद अक्षयला म्हणाला, स्वतः जेवलायस ना, आमच्या भुकेचे काय ? अक्षय म्हणाला, कॅप्टन काय जेवायला भरवेल आता ? अक्षय म्हणाला, घेऊन जा ह्याला... प्रसाद म्हणाला, कोणाच्या बापाचा नोकर आहे का तो ? हे ऐकताच अक्षयला राग अनावर झाला तो म्हणाला, बापावर जाऊ नकोस... प्रसाद म्हणाला हात उचलास तर हात उचलण्याच्या लायकीचा नाही रहणार, एक मारेन तुला अशी.... बघूया हे भांडणं अजून किती वाढलं आणि पुढे काय घडलं...