"आपल्या प्रसिद्धीचा कुठलाही बडेजाव न करता...", बिग बॉसकडून कौतुक ऐकताच अभिजीत सावंतचे डोळे पाणावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 16:31 IST2024-10-01T16:27:37+5:302024-10-01T16:31:52+5:30
'बिग बॉस मराठी'चा आजचा भाग खूप विशेष असणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या इतिहासातात पहिल्यांदाच असं ग्रँड सेलिब्रेशन होणार आहे.

"आपल्या प्रसिद्धीचा कुठलाही बडेजाव न करता...", बिग बॉसकडून कौतुक ऐकताच अभिजीत सावंतचे डोळे पाणावले
Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चा सध्या शेवटचा आठवडा सुरू आहे. या सीझनमध्ये प्रेक्षकांना अनेक सरप्राइजेस मिळाले. आता बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना एक खास सरप्राइज मिळणार आहे. सदस्यांचा बिग बॉस मराठीच्या घरातील आत्तापर्यंतचा प्रवास त्यांच्यासमोर व्हिडिओतून मांडण्यात येणार आहे. 'बिग बॉस मराठी'चा आजचा भाग खूप विशेष असणार आहे. आज घरात 'आपला माणूस' शिव ठाकरे स्पेशल गेस्ट म्हणून जाणार आहे.
'बिग बॉस मराठी'च्या इतिहासातात पहिल्यांदाच असं ग्रँड सेलिब्रेशन होणार आहे. समोर आलेल्या प्रोमोमधील अभिजीत सावंतचा अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 'बिग बॉस मराठी'च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये 'बिग बॉस' म्हणत आहेत,"आपल्या प्रसिद्धीचा कुठलाही बडेजाव न करता, सगळ्यांत मिळून मिसळून वागणारा, कधी गाणी गाऊन मंत्रमुग्ध करणारा अभिजीत सावंत". 'बिग बॉस मराठी'च्या या पर्वातील ग्रँड सेलिब्रेशनमध्ये होणारं कौतुक ऐकून अभिजीतचेही डोळेही पाणावल्याचं व्हिडिओत दिसत आहे. प्रोमोमध्ये अभिजीत म्हणतोय,"या शोने खूप काही दिलंय".
दरम्यान, या आठवड्यात 'बिग बॉस मराठी'चा हा सीझन प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ६ ऑक्टोबरला 'बिग बॉस मराठी'चा अंतिम सोहळा रंगणार असून 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता मिळणार आहे. निक्कीने फिनालेचं तिकीट मिळवून ग्रँड फिनालेमध्ये प्रवेश मिळवला आहे. तर वर्षाताई, अभिजीत, अंकिता, सूरज, जान्हवी, आणि धनंजय यांच्यावर नॉमिनेशनची तलवार आहे. या आठवड्यातही एका सदस्याला घराचा निरोप घ्यावा लागणार आहे. यंदाच्या पर्वाची ट्रॉफी कोण नावावर करणार, हे पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.