“Bigg Boss Marathi 4’च्या होस्टसाठी मी खूप नावं ऐकलेली, पण...”; वाचा, महेश मांजरेकरांची खास मुलाखत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 12:09 PM2022-09-27T12:09:51+5:302022-09-27T12:10:35+5:30

Bigg Boss Marathi 4, Mahesh Manjrekar : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात जाण्यासाठी मुलगी सई आणि गौरीला काय टीप्स द्याल? यंदा कसा असेल स्पेशल लुक? वाचा, महेश मांजरेकरांनी काय दिलं उत्तर...

Bigg Boss Marathi 4 Host Mahesh Manjrekar Exclusive Interview Colors marathi | “Bigg Boss Marathi 4’च्या होस्टसाठी मी खूप नावं ऐकलेली, पण...”; वाचा, महेश मांजरेकरांची खास मुलाखत

“Bigg Boss Marathi 4’च्या होस्टसाठी मी खूप नावं ऐकलेली, पण...”; वाचा, महेश मांजरेकरांची खास मुलाखत

googlenewsNext

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. बिग बॉसच्या घरात कोण कोण जाणार? याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. शिवाय शोचे होस्ट महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar ) यांच्या ‘चावडी’चीही प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. ‘बिग बॉस मराठी 4’ मांजरेकर होस्ट करणार नाहीत, अशी सुरूवातीला चर्चा होती. यामुळे बिग बॉस प्रेमी कमालीचे हिरमुसले होते. पण अखेर मांजरेकर हेच स्पर्धकांची ‘शाळा’ घेणार हे ठरलं आणि चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलं. ‘बिग बॉस मराठी 4’मध्ये यंदा काय काय असणार आहे, हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. तर खुद्द महेश मांजरेकरांनीच याचा खुलासा केलाय.
‘लोकमत फिल्मी’ला मांजरेकरांनी खास मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला.

यंदाचा ‘बिग बॉस’ स्पेशल लुक
‘बिग बॉस मराठी’च्या प्रत्येक सीझनमध्ये मांजरेकर लुकबद्दल वेगवेगळे प्रयोग करताना दिसतात. यंदाच्या सीझनमध्ये तुमचा लुक कसा असणार आहे? यावर मांजरेकर म्हणाले, ‘काही ठरवून केलेला नाहीये लुक़ दाढी तर ठेवायचीच आहे. बºयाचशा गोष्टी लपतात दाढीत. गेल्या वर्षभर मी केसांना कात्री लावलेली नाहीये. कारण खरं तर मला लांब केस ठेवायचे होते. पण त्या किमोनंतर ते कुरळे केस झालेत, त्याचं काय करायचं मला कळत नाही. केसांची पोनी बांधायचा प्रॉब्लेस होता. त्यामुळे दोन पोनी केल्या. त्यामुळे लुक झालाय तो गरजेपोटी. ठरवून काही केलेलं नाही. वजन थोडं वाढलंय. ते कमी करेल हळूहळू... चष्मा वेगवेगळा पाहायला मिळेल. आता मला चष्म्यातही पैसे गुंतवावे लागतील. माझ्या मते, काहीतरी वेगळं करणं गरजेचं असतं. केवळ लुक म्हणून नाही तर ते प्रेक्षकांसाठीही एक सरप्राईज असतं. पण यावेळी एक गोष्ट मात्र कॉमन राहणार आहे. ते म्हणजे माझं मफलर...’

माझं काही ठरलं नव्हतं...
माझा कॉन्ट्रक्ट संपला होता. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी 4’ कुणीतरी वेगळी व्यक्ती होस्ट करणार, असंच मला वाटत होतं आणि मी यासाठी तयार होतो. मी नाही म्हणून मी बघणार नाही, असंही नव्हतं. मला बिग बॉस मराठी बघायला तेवढंच आवडतं. त्यामुळे मी बघणार होतोच. पण मला बोलवल्याचा आनंद होता. मी लगेच होकार दिला. थोडं फार अ‍ॅडजेस्ट करावं लागलं. पण मी  हा शो एन्जॉय करतो. मी कधीच होस्ट म्हणून वेगळं करायचा प्रयत्न करत नाही. मी जसा नॉर्मल आयुष्यात आहे, तसाच तिकडे असतो. त्यामुळे मला फार काही त्रास होत नाही, असंही मांजरेकर म्हणाले.

मी खूप लोकांची नावं ऐकलेली...
‘बिग बॉस मराठी 4’चा होस्ट म्हणून मी खूप लोकांची नावं ऐकलेली. सई ताम्हणकर, मी शरद केळकर ऐकलेलं. मी सयाजी शिंदे ऐकलेलं. पण मला चॉईस दिला असता तर मी सिद्धार्थ जाधवच नाव दिलं असतं. कारण सिद्धार्थमध्ये एक मॅडनेस आहे. तो होल्ड करतो. त्याच्याकडे शब्दांची कमरतरता नाही. त्यामुळे सिद्धू आवडला असता. पव्याही आवडला असता, असं मांजरेकर म्हणाले.

 

Web Title: Bigg Boss Marathi 4 Host Mahesh Manjrekar Exclusive Interview Colors marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.