Bigg Boss Marathi 4 : 'मला तुझा राग कळतो आहे, पण…'; अपूर्वा काढणार विकासची समजूत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 11:56 AM2022-10-25T11:56:29+5:302022-10-25T11:57:03+5:30

Bigg Boss Marathi 4 : नॉमिनेशन कार्याअंती या आठवड्यातील घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये किरण, अमृता देशमुख, त्रिशूल, विकास, योगेश, आणि प्रसाद हे सदस्य नॉमिनेट झाले.

Bigg Boss Marathi 4 : 'I understand your anger, but…'; Apoorva will draw understanding of development | Bigg Boss Marathi 4 : 'मला तुझा राग कळतो आहे, पण…'; अपूर्वा काढणार विकासची समजूत

Bigg Boss Marathi 4 : 'मला तुझा राग कळतो आहे, पण…'; अपूर्वा काढणार विकासची समजूत

googlenewsNext

बिग बॉस मराठीचा चौथा सीझन मनोरंजक वळणावर आला आहे. बिग बॉसच्या घरातून निखिल राजेशिर्के आणि मेघा घाडगे बाहेर पडली आहे. दरम्यान काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पार पडले “नॉमिनेशन रॉकेट” नॉमिनेशन कार्याअंती या आठवड्यातील घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये किरण, अमृता देशमुख, त्रिशूल, विकास, योगेश, आणि प्रसाद हे सदस्य नॉमिनेट झाले.

आता या आठवड्यात कोणत्या सदस्याला घराबाहेर पडावे लागेल, कोणाचा प्रवास संपणार हे या रविवारी कळेलच. नॉमिनेशनमध्ये आल्याने विकास जरा नाराज आहे आणि त्याच संदर्भात आज अपूर्वा त्याच्याशी संवाद साधताना दिसणार आहे. अपूर्वा विकासची समजूत काढणार असून त्याला सांगणार आहे, मला तुझा राग कळतो आहे सगळ्यांनी मिळून तुला नॉमिनेट केले आहे.

अपूर्वा पुढे म्हणाली की, तुला कुठेतरी तो inferiority कॉम्प्लेक्स आहे असं मला जाणवतं आहे. तुला असं वाटतं आहे फक्त दाद्या तुला समजून घेतो. काय होतं ना तू जरी शंभर टक्के बरोबर असला तरी पण दिसताना असं दिसत आहे कि त्यांच्या मेंदूने तू गेम खेळतो आहेस. जेव्हा कि असं नाहीये आणि म्हणून तुझी चिडचिड होते आहे. कारण तुझी निर्णयक्षमता मी बघितली आहे म्हणून आज मी तुला नॉमिनेट नाही केलं. कारण जिथे दादा नाहीये तिथे मी तुला तुझे निर्णय घेताना आणि खेळ खेळताना पहिले आहे… आत बघूया यांच्यात अजून काय चर्चा होते ते. अपूर्वाचं म्हणणं विकासला कळतं का?       

Web Title: Bigg Boss Marathi 4 : 'I understand your anger, but…'; Apoorva will draw understanding of development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.