Bigg Boss marathi 4: किरण माने की रोहित कोण बनणार घराचा नवा कॅप्टन ?,
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 12:40 PM2022-11-10T12:40:23+5:302022-11-10T12:46:51+5:30
आपल्या उमेदवाराला जास्तीत जास्त टेडी बिअर बनवून देतील तो उमेदवार कॅप्टनपद मिळवेल. किरण VS रोहित असा सामना रंगणार आहे,
आज BB कॉलेज मध्ये साजरा होणार आहे Valentine's Day. या valentine's day ला जे समर्थक आपल्या उमेदवाराला जास्तीत जास्त टेडी बिअर बनवून देतील तो उमेदवार कॅप्टनपद मिळवेल. किरण VS रोहित असा रंगणार आजचा टास्क. आता किरण माने आणि रोहित मधून कोण बनेल घराचा नवा कॅप्टन हे आज कळेलच.
तर दुसरीकडे अपूर्वा आणि समृद्धीमध्ये मतभेद होत असल्याचे दिसून येत आहे. अपूर्वाच्या वागण्याने समृद्धी दुखावली आहे. नक्की काय झालं आणि तिला असं वाटतं आहे याविषयी ती अपूर्वाशी चर्चा करताना दिसणार आहे. समृद्धीचे म्हणणे आहे, मला तुझी गरज वाटते आहे जेव्हा तू मैत्रीण म्हणून बघतेस ना कि हि ठीक नाहीये एक पर्संट पण तुला... त्यावर अपूर्वाचे म्हणणे आहे, तुझ्यासोबत यशश्री ऑलरेडी होती.
समृद्धीचे म्हणणे आहे, नॉमिनेशनच जेव्हा झालं मी तुला बोलून नाही दाखवले, माझ्या मनात सुरु होतं सोड ते सोड ते... तुला गरज नाहीये कोणाची, तू आहेस खंबीर... अपूर्वा समृद्धी म्हणाली, तुझी गल्लत होते आहे. आणि ती का होते आहे हा राग अक्षयसाठी आहे जो तू माझ्यावर काढते आहे. समृद्धी म्हणाली, मला फक्त इतकंच विचारायचे आहे तुला हे खरंच पटतं असेल ना मी माघार घेते आणि बोलते अपू सॉरी मी विचार चुकीचा केला असेल. त्यावर अपूर्वा म्हणाली, तू यशश्रीच्या मिठीत पडली होतीस जे मी बघितलं. समृद्धी म्हणाली, मी जशी रडत होते ना... मला हे सांगायची पण इच्छा नहिये कारण आतापर्यंत एकदाही समजवलं नाही गेलं तुझ्याकडून इट्स ओके. तू सोडून जगभराला कळालं कि मी रडत होते, मी किती अपसेट होते.... पण तुला नाही कळलं...