Bigg Boss Marathi 4 : 'कोणालाच झोपू देणार नाही..', राखी सावंत आणि विशालमध्ये कडाक्याचं भांडण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 14:36 IST2022-11-29T14:36:00+5:302022-11-29T14:36:58+5:30
Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात राखी आणि विशालमध्ये कडाक्याचं भांडणं बघायला मिळणार आहे. वादाची सुरुवात अमृता धोंगडे आणि राखी यांच्यापासून झाली.

Bigg Boss Marathi 4 : 'कोणालाच झोपू देणार नाही..', राखी सावंत आणि विशालमध्ये कडाक्याचं भांडण
बिग बॉस मराठीचा चौथा सीझन रंजक वळणावर आली आहे. आज घरात राखी VS विशाल (Rakhi Sawant Vs Vishal Nikam) बघायला मिळणार आहे. वादाची सुरुवात अमृता धोंगडे (Amruta Dhongade) आणि राखी यांच्यापासून झाली. अमृता आणि विशाल बोलत असताना राखीने अमृताला विचारले, तुला झोपायचं नाहीये का ? तुला नृत्य करायचे आहे ? लाईट बंद झाले ना ? अमृता म्हणाली, झोपते आहे कि त्यावर राखी म्हणाली, मग झोप ... आणि इथून वाद सुरु झाला.
अमृता म्हणाली, मला नाही झोपायचं इतक्यात. त्यावर राखी तिला म्हणाली, माझ्या डोक्यावर का नाचतेस ? अमृता म्हणाली, मी इथे बसून नाचते आहे. राखी म्हणाली, मी रात्री बसते तुझ्या डोक्यावर थांब... इडियट...माझी झोपच गेली. आता सगळे झोपल्यानंतर मी बोलणार... उगीच भांडणं ना? विशाल त्यावर म्हणाला, आता झोपा ना तुम्ही. राखी त्यावर म्हणाली, आता नाही झोपणार माझी झोप गेली...बोलणार मी आता, माझी मर्जी. विशाल म्हणाला, तिला शिकवता आणि तुम्ही काय करताय ? तिला का बोलताय एवढं तोंड वर करून. राखी म्हणाली, मी तेच करते आहे जे ती करत होती. विशाल म्हणाला, गप बसायचं. राखी म्हणाली, तू गप बस...
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमो मध्ये विशाल आणि राखीमध्ये कडाक्याचे भांडणं झालेलं आहे असे दिसून येते आहे. राखी बिग बॉस माझी कॉफी पाठवा आता... विशाल म्हणाला, तुमच्या बोलण्याने डिस्ट्रब होत आहे झोपा... राखी म्हणाली तू झोप मला सांगू नकोस ... विशाल म्हणाला अरेरावी नका करू इथे ... राखी म्हणाली माझी मर्जी ... त्यावर विशालने देखील उत्तर दिले मर्जी सगळीकडे नाही चालणार ... विशाल म्हणाला ... ओरड मोठ्याने ... नहीं सोने दुंगी... बघूया हा वाद अजून किती वाढला.