Bigg Boss Marathi 4 : 'या दोघांचं काहीच होणार नाहीये ते...', तेजस्विनीचा योगेशला सल्ला !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 12:43 PM2022-10-24T12:43:37+5:302022-10-24T12:44:08+5:30

Bigg Boss Marathi 4: आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये तेजस्विनीचा ग्रुप आज दुसऱ्या ग्रुपबद्दल चर्चा करताना दिसणार आहे.

Bigg Boss Marathi 4: 'Nothing will happen to these two...', Tejaswini's advice to Yogesh! | Bigg Boss Marathi 4 : 'या दोघांचं काहीच होणार नाहीये ते...', तेजस्विनीचा योगेशला सल्ला !

Bigg Boss Marathi 4 : 'या दोघांचं काहीच होणार नाहीये ते...', तेजस्विनीचा योगेशला सल्ला !

googlenewsNext

बिग बॉस मराठीचा चौथा सीझन (Bigg Boss Marathi 4) रंजक वळणावर आला आहे. घरातून आता दुसरा सदस्य घराबाहेर पडला आहे. निखिल राजेशिर्केनंतर या आठवड्यात मेघा घाडगे घराबाहेर पडली आहे. इतकेच नाही तर तिने घरातील इतर सदस्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. दरम्यान आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये तेजस्विनीचा ग्रुप आज दुसऱ्या ग्रुपबद्दल चर्चा करताना दिसणार आहे. ज्यामध्ये तेजस्विनी (Tejaswini Lonari) तिच्या टीमला सावध करणार आहे. 

नुकतेच मेघा घाडगे(Megha Ghadge)ला घराबाहेर पडावे लागले आणि त्यामुळे घरातील दुसऱ्या ग्रुपची समीकरणं तेजस्विनीला बदलताना दिसत आहेत, ज्याबद्दल ती ग्रुपला सल्ला देणार आहे. विशेषतः योगेशला. तेजस्विनी सांगताना दिसणार आहे, "आता काय झालं आहे काल जे झालं त्यानंतर लगेच सगळे नीट बोलत आहेत. मला काही प्रॉब्लेम नाहीये मी तर तशीही पहिल्या दिवसापासून सगळ्यांशी नीटच बोलते आहे इथे माझी लॉयलीटी मी दाखविली आहे. ते नीट बोले तरी भारावून जाऊ नका. फक्त काळजी घ्या, त्यांची Strength कमी होतं आहे तर त्यांना लोकं पण हवी आहेत. त्यांच्या ग्रुपमध्ये बसायला, टवाळक्या करायला. त्यात तुझा नंबर पहिला आहे (योगेश) emotionally भारावून जाण्यात तू पहिला येतोस. 


अमृता धोंगडे म्हणाली, त्या दोघांचे (किरण आणि विकास) म्हणणे आहे प्रसादसाठी त्यांनी आपल्याशी वैर घेतले. तेजस्विनीचे म्हणणे आहे या दोघांचे काहीच होणार नाहीये ते तसेच राहणार आहेत.  

Web Title: Bigg Boss Marathi 4: 'Nothing will happen to these two...', Tejaswini's advice to Yogesh!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.