Bigg Boss Marathi 4 : …आता मी तिला नाही थांबवणार …, असं कोणाला म्हणतेय तेजस्विनी?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 04:00 PM2022-10-25T16:00:48+5:302022-10-25T16:01:17+5:30

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडलेल्या नॉमिनेशन रॉकेट या कार्यामुळे दोन्ही ग्रुपमध्ये आणि सदस्यांमध्ये चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे.

Bigg Boss Marathi 4 : ... Now I will not stop her ..., to whom is Tejaswini saying? | Bigg Boss Marathi 4 : …आता मी तिला नाही थांबवणार …, असं कोणाला म्हणतेय तेजस्विनी?

Bigg Boss Marathi 4 : …आता मी तिला नाही थांबवणार …, असं कोणाला म्हणतेय तेजस्विनी?

googlenewsNext

बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi 4)च्या घरामध्ये काल पार पडलेल्या नॉमिनेशन रॉकेट या कार्यामुळे दोन्ही ग्रुपमध्ये आणि सदस्यांमध्ये चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. अपूर्वा आणि विकासच्या चर्चेनंतर आता तेजस्विनी देखील अमृता देशमुख, प्रसाद आणि योगेशसोबत चर्चा करताना दिसणार आहे. 

अमृता देशमुखचे म्हणणे आहे तिला दुसऱ्या ग्रुपसोबत खेळून बघायचे आहे. ज्यावर तिला तिच्या ग्रुपमधील सदस्यांनी समजावून सांगितले... पण ती तिच्या निर्णयावर ठाम आहे. तेजस्विनी सांगणार आहे, प्रसाद तुला सारखं जर तिला त्या ग्रुपमध्ये नको जाऊ असं करायचं असेल तर तू करत जा, कारण तिने देखील बघितले आहे तो ग्रुपदेखील equally तयार होता तिला नॉमिनेट करायला. तो वेगळा भाग झाला... पण मला प्रसादला खासगीत सांगायचे आहे, मी अमृताच्या individualityचा खूप आदर करते, त्यामुळे आता मी तिला नाही थांबवणार. कारण मला देखील वाटतं कोणी खुश नसेल तर… पण तू ग्रुप फुटेल म्हणून तिला नको थांबवूस. आता आपल्या ग्रुपमधले जवळजवळ सगळेच नॉमिनेट झाले आहेत. आपण कोणाला अडवून कोणाची प्रगती नको थांबवायला.


यावर योगेश, प्रसाद आणि अमृता देशमुख यांचे काय म्हणणे आहे. बिग बॉस मराठी सोमवार ते शुक्रवारी रात्री १० वाजता आणि शनि - रवि रात्री ९.३० वाजता पहायला मिळेल.

Web Title: Bigg Boss Marathi 4 : ... Now I will not stop her ..., to whom is Tejaswini saying?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.