Bigg Boss Marathi 4 : एकीकडे टीम आखतेय रणनीती, अमृता धोंगडे आणि समृद्धीमध्ये वाद !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 03:22 PM2022-11-01T15:22:44+5:302022-11-01T15:23:06+5:30

Bigg Boss Marathi 4: आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये टीम रणनीती आखताना दिसणार आहेत. एकीकडे तेजस्विनी टीम तर दुसरीकडे अक्षयच्या टीममध्ये जोरदार चर्चा होताना होणार आहे.

Bigg Boss Marathi 4: On the one hand, the team is planning a strategy, Amrita Dhongde and Samriddhi argue! | Bigg Boss Marathi 4 : एकीकडे टीम आखतेय रणनीती, अमृता धोंगडे आणि समृद्धीमध्ये वाद !

Bigg Boss Marathi 4 : एकीकडे टीम आखतेय रणनीती, अमृता धोंगडे आणि समृद्धीमध्ये वाद !

googlenewsNext

आज बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi 4)च्या घरामध्ये टीम रणनीती आखताना दिसणार आहेत. एकीकडे तेजस्विनी टीम तर दुसरीकडे अक्षयच्या टीममध्ये जोरदार चर्चा होताना होणार आहे. आता नक्की कोणती टीम जिंकणार ? कोणता सदस्य बाजी मारणार ? हे आजच्या भागामध्ये कळेल.

तेजस्विनी म्हणाली, मला वाटतं किरण दादा, विकास पहिले त्यांनतर अमृता धोंगडे लगेच म्हणाली, आम्ही दुसरे जाणार आणि त्यावर समृध्दीचे म्हणाली नाही मला जायची ईच्छा आहे मी तुला आधीच बोले होते तेजु. तेजस्विनीसाठी हा निर्णय घेणं कठीण होऊन बसणार आहे कारण तिचं म्हणणं आहे तुम्ही सगळेच स्ट्रोंग आहात. त्यावर समृध्दी म्हणाली पण लास्ट टाईम मी काहीच परफॉर्म नाही केलं आहे त्यामुळे खरंच मला... त्यावर अमृता म्हणाली, पण तुला मिळणार आहे परफॉर्म करायला. आणि यावरून समृध्दी आणि अमृता मध्ये वादावादी सुरू झाली. समृध्दी म्हणाली, मी देखील तुला असं बोलूच शकते ना ? अमृता म्हणाली हो पण मला खेळायचे आहे. आता या दोघी अडून आहेत बघूया तेजस्विनीचा निर्णय काय असेल ? 

दुसरीकडे अक्षय आणि टीम चर्चा करताना दिसणार आहेत. अक्षय टीमला सांगणार आहे, आपल्याला जो वाटतो आहे एक त्याला टार्गेट करायचे आणि दुसरा असाच टाईमपास करायचा. जर चार असतील तर तीन जणांनी एकावर टार्गेट करायचं आणि एकाने एकावर ...साध्या पाण्याने आंघोळ घालून थंड करून टाकायचे गेल्या गेल्या आणि मग आपला कार्यक्रम सुरू करायचा. बघूया दोन्ही टीम रणनीती आखत आहेत... पण विजयी एकचं टीम होणार आहे. अजून काय झालं घरात कोणत्या चर्चा रंगल्या आणि कोणामध्ये झाला वाद आजच्या भागात कळेल. 

Web Title: Bigg Boss Marathi 4: On the one hand, the team is planning a strategy, Amrita Dhongde and Samriddhi argue!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.