Bigg Boss Marathi 4 : प्रसादच्या आईने कवितेतून दिला सदस्यांना मोलाचा सल्ला, चाहते म्हणतात 'किती गोड'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 10:23 AM2022-12-23T10:23:01+5:302022-12-23T10:25:38+5:30

'बिग बॉस मराठी' (Big Boss Marathi) सध्या रंजक वळणावर आहे. स्पर्धेतील रंजकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

bigg-boss-marathi-4-prasad-jawade-mother-read-poem-gave-advice-to-all-competitors | Bigg Boss Marathi 4 : प्रसादच्या आईने कवितेतून दिला सदस्यांना मोलाचा सल्ला, चाहते म्हणतात 'किती गोड'

Bigg Boss Marathi 4 : प्रसादच्या आईने कवितेतून दिला सदस्यांना मोलाचा सल्ला, चाहते म्हणतात 'किती गोड'

googlenewsNext

Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी' (Big Boss Marathi) सध्या रंजक वळणावर आहे. स्पर्धेतील रंजकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.  जसेजसे पर्व शेवटाकडे जात आहे स्पर्धक भावूक झाले आहेत. सध्याचा आठवडा हा स्पर्धकांसाठी फॅमिली वीक आहे. इतके दिवस घरापासून आणि जवळच्या माणसांपासून दूर असणारे सदस्य त्यांच्या कुटुंबीयांना भेटत आहेत आणि भावनांना वाट मोकळी करुन दिली जात आहे.

'कलर्स'ने नुकत्याच पोस्ट केलेल्या प्रोमोमध्ये स्पर्धक प्रसाद जावडेची (Prasad Jawade) आई बिग बॉसच्या घरात आली आहे. सर्व स्पर्धक तिच्या अवतीभोवती बसले आहेत आणि प्रसादची आणि एक कविता वाचून  दाखवत आहे. आईच्या बाजूला बसलेला प्रसादही कौतुकाने बघतोय तर भावूकही झाला आहे. इतरांना माफ करायला शिका असा मोलाचा सल्ला प्रसादच्या आईने सर्वांना कवितेच्या माध्यमातून दिला आहे. यावर चाहत्यांनीही कमेंट केली आहे. 'प्रसादची आई किती गोड आहे, खूप छान' अशा कमेंट प्रेक्षक करत आहेत. 

कोण होणार विजेता?

Bigg Boss Marathi 4 : तूच जिंकणार आहेस ! अपूर्वाच्या वडिलांनी दिला विश्वास; आईला बघून अपूर्वा म्हणते...

बिग बॉस मराठी ४' ता कोण होणार, हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. घरातील ७७ दिवस पार पडले आहेत त्यामुळे आता विजेता कोण होणार, हे जाणून घेण्यासाठी केवळ 2 आठवड्यांचा कालावधी उरला आहे. प्रसाद जवादे आणि अमृता धोंगडे हे ‘बिग बॉस मराठी 4’च्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मात्र मायबाप प्रेक्षक कोणाला आपला कौल देतात, ते बघणं इंटरेस्टिंग असणार आहे.

Web Title: bigg-boss-marathi-4-prasad-jawade-mother-read-poem-gave-advice-to-all-competitors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.