Bigg Boss Marathi 4 : प्रसाद जवादेचं १२ वर्षांपूर्वीचं 'नाना' कनेक्शन पुन्हा आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 07:16 PM2022-11-22T19:16:35+5:302022-11-22T19:17:00+5:30

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या घरात प्रसाद जवादे आपल्या हटके व्यक्तीमत्वामुळे आणि खेळामुळे बाहेर प्रसिद्धी मिळवत आहे.

Bigg Boss Marathi 4: Prasad Jawade's 'Nana' connection from 12 years ago has come to the fore again | Bigg Boss Marathi 4 : प्रसाद जवादेचं १२ वर्षांपूर्वीचं 'नाना' कनेक्शन पुन्हा आले समोर

Bigg Boss Marathi 4 : प्रसाद जवादेचं १२ वर्षांपूर्वीचं 'नाना' कनेक्शन पुन्हा आले समोर

googlenewsNext


बिग बॉस मराठीचे चौथे सीझन (Bigg Boss Marathi 4) रंजक वळणावर आले आहे. या सीझनमधील स्पर्धक कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असतात. दरम्यान या सीझनमधील स्पर्धक प्रसाद जवादे (Prasad Jawade) एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. प्रसाद जवादे आपल्या हटके व्यक्तीमत्वामुळे आणि खेळामुळे बाहेर प्रसिद्धी मिळवत आहे. बिग बॉस मराठीच्या नुकत्याच एका टास्कदरम्यान त्याने केलेली नाना पाटेकर (Nana Patekar) यांची मिमिक्री लोकांना खूपच आवडली. खुद्द महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) सरांनी देखील त्याच्या या मिमिक्रीचे कौतुक केले. 

महेश सरांनी केलेले प्रसादचे कौतुक १२ वर्षापूर्वीची एक आठवण ताजा करून गेली. ती आठवण म्हणजे महाराष्ट्राचा सुपरस्टार हा रिऍलिटी शो. या रिऍलिटी शोमध्ये प्रसाद जवादे याने देखील भाग घेतला होता. त्यादरम्यान वास्तव सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शन करून महेश मांजरेकर सरांनी बॉलिवूडमध्ये आपले अस्तित्व प्रस्थापित केले. अर्थात, त्यामुळेच या रियालिटी शो चे सुपरस्टार जर्ज महेश मांजरेकर होते.  ज्यात प्रसादने नाना पाटेकर यांची मिमिक्री करत महेश मांजरेकर सरांना इंप्रेस केलं होते. हाच क्षण सलग १२ वर्षानंतर पुन्हा एकदा बिग बॉस सीजन ४ च्या घरात योगायोगाने घडला. 


एका टास्कमध्ये प्रसादने नानांची मिमिक्री केली, आणि मांजरेकरांनी यावरून त्याचे चावडीवर कौतुक केले. त्याचे हे १२ वर्षांपूर्वीचे कनेक्शन नुकत्याच त्याच्या टीमने प्रसादच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केली आहे.

Web Title: Bigg Boss Marathi 4: Prasad Jawade's 'Nana' connection from 12 years ago has come to the fore again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.