Bigg Boss Marathi 4 : राखी सावंतचा 'गेम ओव्हर'! ९ लाख घेत पडली घराबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 08:28 PM2023-01-08T20:28:48+5:302023-01-08T20:29:06+5:30

Rakhi Sawant : आता राखी सावंतचा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे.

Bigg Boss Marathi 4: Rakhi Sawant's 'Game Over'! 9 lakh and left the house | Bigg Boss Marathi 4 : राखी सावंतचा 'गेम ओव्हर'! ९ लाख घेत पडली घराबाहेर

Bigg Boss Marathi 4 : राखी सावंतचा 'गेम ओव्हर'! ९ लाख घेत पडली घराबाहेर

googlenewsNext

बिग बॉस मराठीचा चौथा सीझन (Bigg Boss Marathi 4) आज प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.  या महाअंतिम सोहळ्याला सुरूवात झाली आहे. अंतिम सोहळ्यापर्यंत अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, अक्षय केळकर, राखी सावंत आणि किरण माने पोहचले होते. या टॉप ५ मधून बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. दरम्यान आता राखी सावंतचा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे.  ९ लाख घेऊन घराबाहेर पडली आहे.

बिग बॉसने सदस्यांना बुचकळ्यात टाकत पाचही स्पर्धकांसमोर पैशांची बॅग ठेवली होती आणि त्यात आहेत तब्बल ९ लाख रुपये. ज्यांना हे पैसे हवे असतील त्यांनी समोर येऊन बझर वाजवणार होते आणि घराबाहेर पडणार होते. हे बघितल्यावर पाचही स्पर्धकांच्या चेहऱ्यावर प्रश्न पडलेला दिसतोय. ९ लाख ही खरं तर खूप मोठी रक्कम आहे माझ्यासाठी असं अपूर्वा नेमळेकर म्हणते. राखी सावंत सर्वांना ते पैसे घ्या असं म्हणते पण अखेर तिच ९ लाख घेऊन घराबाहेर पडली आहे. 

राखी सावंतने पैसे स्वीकारल्यानंतर इतर स्पर्धकांना म्हणते की, तुम्ही घेतले नाहीत हे पैसे त्यामुळे मला घ्यावे लागले. माझ्या आईसाठी मी एकटी कमावते. त्यानंतर सर्व स्पर्धकांना ते सेफ आहेत की नाहीत हे पाहायला सांगितले जाते. त्यात अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, अमृता धोंगडे आणि किरण माने सेफ असतात. मात्र राखी सावंतचा गेम ओव्हर झालेला असतो. त्यामुळे राखीला ते पैसे स्वीकारले ते बरे झाले, असे वाटले.  राखी सावंत घराबाहेर पडल्यानंतर आता बिग बॉस मराठीच्या घरात ४ सदस्य उरले आहेत. त्यांच्यातील आता ही ट्रॉफी कोण कमावणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.
 

Web Title: Bigg Boss Marathi 4: Rakhi Sawant's 'Game Over'! 9 lakh and left the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.