Bigg Boss Marathi 4 : रोहितला अनफॉलो का केलं? रूचिरा जाधवने सांगितलं नेमकं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 05:54 PM2022-11-16T17:54:43+5:302022-11-16T17:55:02+5:30
Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी 4’ हा शो सध्या जाम चर्चेत आहे. कालपरवाच रूचिरा जाधव (Ruchira Jadhav ) घरातून बाद झाली. मग काय? ती बाद झाल्यानंतर रोहित शिंदेचं (Rohit Shinde) काय होणार? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला....
Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी 4’ हा शो सध्या जाम चर्चेत आहे. कालपरवाच रूचिरा जाधव (Ruchira Jadhav ) घरातून बाद झाली. मग काय? ती बाद झाल्यानंतर रोहित शिंदेचं (Rohit Shinde) काय होणार? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला. कारण रोहित व रूचिरा हे दोघंही आधीपासूनच रिलेशनशिपमध्ये होते. कपल म्हणूनच दोघांनी घरात एन्ट्री घेतली होती. पण प्रत्यक्षात बिग बॉसच्या घरात गेल्यावर रोहित व रूचिरा यांच्यात खटके उडू लागलेत.
दोघांत इतकं बिनसलं की, बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताना रूचिराने रोहितकडे थेट दुर्लक्ष केलं आणि घरातून बाहेर आल्या आल्या सर्वप्रथम रोहितला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं. असं का? असा प्रश्न चाहत्यांना नक्कीच पडला असेल. तर आता रूचिराने यामागचं कारण सांगितलं आहे. इन्स्टाग्राम लाईव्हदरम्यान तिने या प्रश्नाला उत्तर दिलं.
काय म्हणाली रूचिरा...
मी रोहितला अनफॉलो का केलं? हे तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य नाही तर परमकर्तव्य आहे. जे लोक मला खूप सुरुवातीपासून फॉलो करतात त्यांना माझ्याबद्दल चांगलं माहिती आहे. मी फार व्यक्तींना कधीही फॉलो केलेलं नाही. 10, 20 फार फार तर 25 इतकेच लोक होते. आता टीम हँडल करत होती त्यामुळे ते कदाचित 35 ते 40 पर्यंत गेले असावं. मी फक्त प्रेरणादायी व्यक्तींना फॉलो करते, दुसरं मी माझ्या कुटुंबाला फॉलो करते. रोहित हा माझ्या कुटुंबातील व्यक्तींपैकी एक आहे. त्याबरोबरच माझे इतर काही मित्र मैत्रिणी आहेत ते मला फॉलो करायचे आणि मी त्यांना फॉलो बॅक करायचे. त्यावेळी ते मनापासून केलेले फॉलोईंग होतं. पण मला सकाळी सकाळी इन्स्टाग्राम बघायची सवय आहे. मी फेसबुक फार कमी वापरते. सकाळी उठल्यानंतर मला काय बघायला आवडेल, तेच आणि त्याच लोकांना फॉलो करते. हा माझा क्लिअर फंडा आहे. कोणाच्या आयुष्यात काय सुरु आहे, हे जाणून घ्यायची सवय मला नाही.
आता रोहितला अनफॉलो करण्यामागंच कारण म्हणजे मी त्याला फक्त इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केलं आहे. मी त्याला ब्लॉक केलेलं नाही किंवा फेसबुकवरुन अनफॉलो केलेलं नाही. फक्त इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे, कारण तो अजूनही बिग बॉसमध्ये आहे. त्याच्या त्या गोष्टी सतत त्याच्या अकाऊंटवर येत जातात. मी जेव्हा त्या बघेन तेव्हा मला त्रास होईल. त्यामुळे माझा थोडा तरी विचार करा. प्रश्न विचारुन मला त्रास देऊ नका. हेच त्यामागचं कारण आहे. जेव्हा त्या गोष्टी शॉर्ट होतील तेव्हा मी त्याला मनापासून फॉलो करेन. फॉलो आणि अनफॉलो हे मी सतत करणार नाही... मला लाखो रुपये दिले तरी मी त्याला फॉलो करणार नाही... अनफॉलो केल्यामुळे लगेचच तर्क-वितर्क लावू नका. एखाद्या निष्कर्षापर्यंत पोहोचू नका..., असं ती म्हणाली.