Bigg Boss Marathi 4 : समृद्धी या सदस्याला सपोर्ट नाही करणार ?, जाणून घ्या कोण आहे ती व्यक्ती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 15:47 IST2022-11-24T15:47:30+5:302022-11-24T15:47:58+5:30
Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या घरात आज समृद्धी, अमृता धोंगडे, किरण माने आणि विकास एका विषयावर चर्चा करताना दिसणार आहेत.

Bigg Boss Marathi 4 : समृद्धी या सदस्याला सपोर्ट नाही करणार ?, जाणून घ्या कोण आहे ती व्यक्ती?
बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi 4)च्या घरात आज समृद्धी, अमृता धोंगडे, किरण माने आणि विकास एका विषयावर चर्चा करताना दिसणार आहेत, ज्यामध्ये समृद्धीने जाहीर केले ती या व्यक्तीला सपोर्ट करणार नाही.
टास्क दरम्यान सदस्य एकमेकांशी चर्चा करताना दिसतात. ज्यामध्ये ते टास्क दरम्यान कोणती स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे, कोणाला कसं बाजूला करता येईल याविषयी बोलताना आणि रणनिती आखताना दिसतात. समृद्धीचे म्हणणे आहे, आता मला रोहित झाला तरी चालेल अपूर्वा झाली तरी चालेल मी तेजाला सपोर्ट करणार नाही. मी तिला चालता चालता बोलते आहे मी तुला काही करत नाहीये, त्यांच्यामधला नाही. दोनदा बोले मी.
किरण माने म्हणाले, पहिल्यांदा अपूर्वाच्या पोत्यातले तिनेच काढले होते ना ? अमृता धोंगडेने विचारले, मग दुसऱ्यांदा काय झाले ? समृद्धी म्हणाली, तिला influence केलं त्यांनी आणि अक्षय आल्यावर... अमृता म्हणाली, स्नेहा आणि अक्षय तिला वरून सांगत आहेत, तेजस्विनीला... मला असं झालं हे कधी झालं ? आता यांचं नक्की काय म्हणणे आहे ? समृद्धीने तेजस्विनीला पाठींबा देण्यास का नकार दिला ? बघूया आजच्या भागामध्ये.