Bigg Boss Marathi 4 : घरात रंगणार 'सोसल तितकंच सोशल' साप्ताहिक कार्य !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 11:41 AM2022-11-15T11:41:01+5:302022-11-15T11:41:40+5:30

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेत कोणते सदस्य नॉमिनेट होणार हे आजच्या भागात कळेलच.

Bigg Boss Marathi 4: 'Social as much as social' weekly task will be played in the house! | Bigg Boss Marathi 4 : घरात रंगणार 'सोसल तितकंच सोशल' साप्ताहिक कार्य !

Bigg Boss Marathi 4 : घरात रंगणार 'सोसल तितकंच सोशल' साप्ताहिक कार्य !

googlenewsNext

बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेत कोणते सदस्य नॉमिनेट होणार हे आजच्या भागात कळेलच. पण आज घरामध्ये सदस्यांना गमवाव्या लागणार आहेत त्यांच्या काही मौल्यवान वस्तू... कारण घरात रंगणार आहे “सोसल तितकंच सोशल” - साप्ताहिक कार्य ! या टास्कमध्ये सदस्यांची कसोटी लागते कारण पणाला लागतात त्यांच्या काही महत्वाच्या गोष्टी. आता टीम्स सदस्यांना कोणत्या गोष्टींचे बलिदान द्यायला सांगणार हे आजच्या भागामध्ये कळेलच. पण सदस्य ते करण्यास तयार होतील का? हा देखील मोठा प्रश्न आहे. #CHALLENGE सदस्य कसे पूर्ण करतील ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. 

प्रोमोमध्ये तेजस्विनी आणि अपूर्वा पदार्थ खाताना दिसतं आहे आणि तो काही तितकासा स्वादिष्ट नसणार हे आपल्याला माहितीच आहे. तर अक्षय रोहितला सांगताना दिसणार आहे रुचिराचा फोटो फाड आणि बॉटल आहे ती नष्ट कर. तर दुसरीकडे स्नेहलता सदस्यांचे कपडे फाडताना आणि हेअर ड्रायर नष्ट करताना दिसत आहे.

विकास आणि प्रसादला अक्षयने खूप मोठं चॅलेंज दिले. त्याचे म्हणणे आहे डोक्यावर ट्रीमर फिरवून दाखवा... विकास - प्रसाद ते करताना दिसत आहेत...  प्रसाद हे करताना नाखूष असला तरी त्याने हे चॅलेंज स्वीकारले आहे. बघूया टास्कमध्ये पुढे काय काय होणार ? सदस्यांच्या कोणकोणत्या गोष्टी पणाला लागणार आजच्या भागामध्ये. पुढे काय झाले जाणून घेण्यासाठी बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वाजता पाहावे लागेल.

Web Title: Bigg Boss Marathi 4: 'Social as much as social' weekly task will be played in the house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.