Bigg Boss Marathi 4 : तेजस्विनी लोणारी ठरतेय चाहत्यांसाठी फेव्हरेट, आदिश वैद्यचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 12:56 PM2022-10-22T12:56:31+5:302022-10-22T12:56:57+5:30

Tejaswini Lonari : आता बिग बॉस मराठीच्या घरातील तेजस्विनी लोणारी चाहत्यांसाठी फेव्हरेट ठरते आहे.

Bigg Boss Marathi 4 : Tejaswini Lonari becomes fan favorite, Adish Vaidya's support | Bigg Boss Marathi 4 : तेजस्विनी लोणारी ठरतेय चाहत्यांसाठी फेव्हरेट, आदिश वैद्यचा पाठिंबा

Bigg Boss Marathi 4 : तेजस्विनी लोणारी ठरतेय चाहत्यांसाठी फेव्हरेट, आदिश वैद्यचा पाठिंबा

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi 4)चा यंदा चौथा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बॉसच्या घरात सदस्यांना दाखल होऊन १८ दिवस उलटले आहेत. आता हा शो रंजक वळणावर आला आहे. घराघरात दररोज नवीन वाद, भांडणं, मैत्री आणि रुसवे फुगवे पाहायला मिळतात. दरम्यान आता बिग बॉस मराठीच्या घरातील तेजस्विनी लोणारी चाहत्यांसाठी फेव्हरेट ठरते आहे.

उगाच आरडा ओरड आणि विनाकारण वाद न ओढुन, बिगबॉस मराठी सीजन ४च्या घरात टास्क क्विन ठरत असलेल्या तेजस्विनी लोणारीने चाहत्यांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. नुकत्याच झालेल्या कॅप्टनशीप कार्यात तेजस्विनीची टीम ज्या पद्धतीने हरली, त्यावर प्रेक्षकांचा संचालक रूचिरावर आक्रोश पाहायला मिळाला. इतकेच नव्हे तर, कॅप्टन बनलेल्या अपूर्वा नेमळेकरने तेजस्विनीला मैत्रीण अमृता धोंगडे सोबत एक आठवडा बोलणे बंद करण्याचा आदेश दिला आहे. ज्यामुळे तेजस्विनी आणि अमृताला एकमेकांपासून दूर राहावे लागणार असल्यामुळे अश्रू अनावर झाले. 


नेहमी हसमुख दिसणारी तेजस्विनी पहिल्यांदाच बिग बॉसच्या कॅमेऱ्यासामोर ढसाढसा रडताना संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. तिच्या या रडण्याने तिचे चाहते देखील भावूक झाले असून तिच्या सोशल मीडियावर तिला मोठया प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.


केवळ चाहते नव्हे तर बिग बॉसच्या मागील सिजन चे स्पर्धक देखील तिच्या संयमी वृत्तीचे कौतुक करत आहे. गत सिझन चा वाईल्ड कार्ड सदस्य आदिष वैद्यने तेजस्विनीला पसंती दर्शवली आहे.

Web Title: Bigg Boss Marathi 4 : Tejaswini Lonari becomes fan favorite, Adish Vaidya's support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.