Bigg Boss Marathi 4 : टास्कमध्ये ही मौल्यवान गोष्ट नष्ट करण्यासाठी तेजस्विनीचा नकार, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 01:40 PM2022-11-16T13:40:35+5:302022-11-16T13:42:48+5:30

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरु असलेल्या टास्कमध्ये सदस्यांना त्यांच्या मौल्यवान गोष्टी गमवाव्या लागणार आहेत.

Bigg Boss Marathi 4 : Tejaswini's refusal to destroy this precious thing in the task, says… | Bigg Boss Marathi 4 : टास्कमध्ये ही मौल्यवान गोष्ट नष्ट करण्यासाठी तेजस्विनीचा नकार, म्हणाली...

Bigg Boss Marathi 4 : टास्कमध्ये ही मौल्यवान गोष्ट नष्ट करण्यासाठी तेजस्विनीचा नकार, म्हणाली...

googlenewsNext

बिग बॉस मराठीचा चौथा सीझन (Bigg Boss Marathi 4) सुरूवातीपासून चर्चेत आला आहे. सध्या शो रंजक वळणावर आला आहे. नुकतीच बिग बॉसच्या घरातून रुचिरा जाधव बाहेर पडली आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरु असलेल्या टास्कमध्ये सदस्यांना त्यांच्या मौल्यवान गोष्टी गमवाव्या लागणार आहेत. त्यांना त्यांच्या जवळच्या गोष्टींचा त्याग करावा लागणार आहे आणि याचसाठी काल रोहितने नकार दिला. आज तेजस्विनीचे देखील असेच काहीसे म्हणणे आहे.

तेजस्विनीने अक्षयला विचारले, तू मेकअपचे काय करायला लावणार आहेस सांग ? अक्षयचे म्हणणे आहे, नष्ट करायचे, दोघांनी नष्ट करायचे. कपडे की मेकअप ? तेजस्विनी म्हणाली, हे एक्सपेन्सिव्ह आहे... मी नाही करू शकत. अमृता देशमुख म्हणाली, ती म्हणते आहे ती फक्त माझं नाही त्यांचे पण करेल. I AM Ok. 


तेजस्विनी म्हणाली, जर तू हे नष्ट केलंस ... अमृता देशमुख म्हणाली, I am not in this... मी नाहीये ह्यात कारण त्या पण नाही म्हणतं आहेत. अक्षयचे म्हणणे आहे, त्यांचा कॉल आहे तो. तेजस्विनीचे म्हणणे आहे, मी हे फोडणार नाहीये हे एवढं एक्सपेन्सिव्ह आहे, कारण मी बघितलं आहे स्नेहलताचं काही फायदा होत नाही त्याचा. आता बघूया तेजस्विनीचा अंतिम निर्णय काय असेल ? पुढे काय झाले जाणून घेण्यासाठी बिग बॉस मराठी सोमवार ते शुक्रवारी रात्री १० वाजता आणि शनिवारी - रविवारी रात्री ९.३० वाजता पाहावे लागेल.

Web Title: Bigg Boss Marathi 4 : Tejaswini's refusal to destroy this precious thing in the task, says…

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.