Bigg Boss Marathi 4 : "त्या चार जणांचा ग्रुप होणार हे नक्की...", नक्की कोणाबद्दल बोलतेय यशश्री

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 01:04 PM2022-11-01T13:04:26+5:302022-11-01T13:23:23+5:30

बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi 4)च्या घरामध्ये नुकतेच बिग बॉस यांनी सदस्यांवर विष - अमृत हे नॉमिनेशन कार्य सोपवले

Bigg Boss Marathi 4 : "There will definitely be a group of four...", Yashshree talking about whom? | Bigg Boss Marathi 4 : "त्या चार जणांचा ग्रुप होणार हे नक्की...", नक्की कोणाबद्दल बोलतेय यशश्री

Bigg Boss Marathi 4 : "त्या चार जणांचा ग्रुप होणार हे नक्की...", नक्की कोणाबद्दल बोलतेय यशश्री

googlenewsNext


बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi 4)च्या घरामध्ये नुकतेच बिग बॉस यांनी सदस्यांवर विष - अमृत हे नॉमिनेशन कार्य सोपवले. जो सदस्य पेटारा उघडून त्यातील विष मिळवेल तो ठरवेल विरोधी टीममधील कोणता सदस्य नॉमिनेट होईल. तसेच सदस्याला सुरक्षित देखील करण्याची पॉवर सदस्यांना दिली गेली. तर दुसरीकडे आज यशश्री, त्रिशूल आणि समृध्दीमध्ये बिग बॉस मराठीच्या घरातील ग्रुप आणि सदस्यांचे कोणाशी चांगले आहे कोण कोणाला आवडत आणि कोणाचा ग्रुप पुढे होऊ शकतो यावर चर्चा होताना दिसणार आहे. 

त्रिशूल सांगताना दिसणार आहे, याआधी देखील आपण बोलो आपण आपली टीम बनवू शकतो. समृध्दी म्हणाली, त्यावेळेस आपण खुपचं उडत उडत बोलो होतो पण आता आपल्याला कळत आहे परिस्थिती काय आहे ते. आपण सावली नाही झालो पाहिजे यांच्यात. माझे, तुझे आणि यशश्रीचे सहमत आहे म्हणजेच आपण तिघे आता सेम मतावर आहोत. तुमची काय आहेत मत अजून कोण हवं? यशश्री म्हणाली रु आणि रो.

आपण बघुया पुढे काय होत सध्या कुठे नको बोलायला... कारण स्नेहलता अमृता देशमुखच्या आणि अक्षयच्या बाजूने आहे. ती अपूर्वाच्या बाजूने पण नाहीये फार... आहे पण अपूर्वा स्ट्राँग आहे आणि म्हणूनच ती तो ग्रुप पकडून चालणार आणि त्या चार जणांचा नक्कीच ग्रुप होणार. बघूया अजून काय झालं घरात कोणत्या चर्चा रंगल्या आणि कोणामध्ये झाला वाद आजच्या भागात.
 

Web Title: Bigg Boss Marathi 4 : "There will definitely be a group of four...", Yashshree talking about whom?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.