Bigg Boss Marathi 4 : ‘टुकटुक राणी’ यशश्री मसुरकर बिग बॉसमधून आऊट, आज कोणाचा नंबर?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 12:28 PM2022-11-20T12:28:11+5:302022-11-20T12:30:04+5:30

Bigg Boss Marathi 4 , Yashashree Masurkar : या आठवड्यात बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच दोन सदस्य आऊट होणार आहेत. त्यातील यशश्री मसुरकर ही घराबाहेर पडणारी पहिली सदस्य आहे....

Bigg Boss Marathi 4 tuktuk rani fame yashashree masurkar out form BB show | Bigg Boss Marathi 4 : ‘टुकटुक राणी’ यशश्री मसुरकर बिग बॉसमधून आऊट, आज कोणाचा नंबर?

Bigg Boss Marathi 4 : ‘टुकटुक राणी’ यशश्री मसुरकर बिग बॉसमधून आऊट, आज कोणाचा नंबर?

googlenewsNext

एकीकडे हिंदी बिग बॉस सुरू आहे तर दुसरीकडे मराठी बिग बॉस. दोन्ही शो जबरदस्त चर्चेत आहेत. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात सध्या स्पर्धक नुसता धुमाकूळ घालत आहेत.  या आठवड्यात ‘सोसल तेवढचं सोशल’ या टास्कमध्ये स्पर्धकांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. एकमेकांची डोकी भादरण्यापासून ते मिरची, कच्चे अंडे खाऊ घालण्या पर्यंत सगळं काही केलं आणि बघता बघता या आठवड्याच्या एलिमेनेशनची वेळ येऊन ठेपली. या आठवड्यात दोन स्पर्धकांना घराबाहेर पडावं लागणार असल्याचं होस्ट महेश मांजरेकरांनी आधीच स्पष्ट केलं होतं. त्यानुसार, काल ‘टुकटुक राणी’ अर्थात अभिनेत्री यशश्री मसुरकर ही घरातून बाद झाली आहे. आता यशश्रीनंतर घरातून बाहेर पडणारा दुसरा सदस्य कोण? हे आजच्या एपिसोडमध्ये कळणार आहे.

यशश्रीसोबत किरण माने, अमृता देशमुख, तेजस्विनी लोणारी हे डेंजर झोनमध्ये होते. त्यातून यशश्री बाद झाली तर अमृता व तेजस्विनी दोघी आधीच सेफ झाल्या. त्यामुळे आता किरण माने व अमृता देशमुख या दोघांपैकी एक जण घरातून बाहेर पडेल, असं मानलं जात आहे. आता हा सदस्य कोण? याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

आणि यशश्री तरातरा बाहेर पडली..
 यशश्रीचा बिग बॉसच्या घरातील प्रवास इथेच संपत असल्याचं मांजरेकरांनी सांगितलं आणि तशी यशश्री उठली व तरातरा घराबाहेर पडली. सामान्यत: घरातून बाहेर पडण्याआधी सदस्य घरातील सर्वांना भेटतात. पण यशश्री एकाही सदस्याला न भेटताच घराबाहेर पडली. मांजरेकरांनी तिला यामागचं कारण विचारलं असता ती म्हणाली, घरातून बाहेर पडताना सर्वांना भेटले असते तर मी खूप भावूक झाले असते. मला रडायचं नव्हतं म्हणून की कोणाला न भेटता घराबाहेर आले.


 
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर यशश्रीने तिच्या सोशल मिडियावर तिच्या चाहत्यांसाठी एक खास पोस्ट शेअर केली. या पोस्टद्वारे तिने तिच्या चाहत्यांचे आभार मानले आहे.यात तिने तिने लिहिलं आहे,‘तुमच्या सहकार्याबद्दल आभार... खूप खूप प्रेम’.

Web Title: Bigg Boss Marathi 4 tuktuk rani fame yashashree masurkar out form BB show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.